पुणे, दि. 5 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जून 2025 मध्ये घेण्यात आलेल्या डी.एल.एड. परीक्षेचा निकाल https://www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व छायाप्रत मागणीसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2025 असा राहील, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
डी.एल.एड. परीक्षेसाठी मराठी माध्यमांच्या 9 हजार 961, उर्दू- 2 हजार 318, हिंदी- 262, इंग्रजी- 1 हजार 331 व कन्नड माध्यमांच्या 30 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण 13 हजार 526 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 9 हजार 2 विद्यार्थी म्हणजे 64.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळणार आहे, अशी माहितीही श्रीमती ओक यांनी दिली आहे.
0000


