पुणे : पुणे परिवारच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे माजी अध्यक्ष दत्तात्रय कावरे यांना जाहीर झाला आहे. गुरुवार, दिनांक ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता एसपी महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गणेशोत्सव कार्यकर्त्यांना ‘आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे परिवारचे विनायक घाटे, ॲड. प्रताप परदेशी , शिरीष मोहिते यांनी दिली.
माजी आमदार उल्हास पवार, आमदार हेमंत रासने, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, पुनीत बालन, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, महेश सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत.
होनाजी तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष राहुल आलमखाने, तरुण शिव गणेश मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश जगताप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाचे कार्यकर्ते ओंकार कलढोणकर, विधायक मित्र मंडळाचे अध्यक्ष अभिषेक मारणे, सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील यांना आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. समर्थ प्रतिष्ठान वाद्य पथकाचे संजय सातपुते यांना गणराया गुणगौरव पुरस्कार तर सामाजिक कार्यकर्ता सिराज पूनावाला यांना सद्भावना सलोखा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
—————————————————————————————-


