Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेएसबी लिमिटेडची २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी, शाश्वत वाढ आणि लवचिकता...

केएसबी लिमिटेडची २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी, शाश्वत वाढ आणि लवचिकता अधोरेखित

पुणे , ९ ऑगस्ट २०२५ : भारतातील आघाडीच्या पंप आणि व्हॉल्व्ह उत्पादकांपैकी एक असलेल्या केएसबी लिमिटेडने २०२४ च्या याच कालावधीच्या तुलनेत या सहामाहीच्या विक्रीत (जानेवारी ते जून २०२५) ६.०४% वाढ दर्शवली

30 जून 2025 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत विक्री 666.7 कोटी रूपयांपर्यंत पोहचली आहे.गेल्या वर्षी याच काळात विक्री 646 कोटी रूपये होती.निव्वळ नफा 72.7 कोटी रूपयांपर्यंत पोहचला असून गेल्या वर्षी 68.6 कोटी रूपये इतका होता.

जानेवारी 2025 ते जून 2025 या सहामाहीत विक्री 1262.1 कोटी रूपयांपर्यंत पोहचली आहे.गेल्या वर्षी याच काळात विक्री 1190.2 कोटी रूपये होती. निव्वळ नफा 121.7 कोटी रूपयांपर्यंत पोहचला आहे.गेल्या वर्षी निव्वळ नफा 111.7 कोटी रूपये होता.

दुसऱ्या तिमाहीच्या कामगिरीबाबत बोलताना केएसबी चे उपाध्यक्ष (विक्री आणि विपणन) प्रशांत कुमार म्हणाले की, “२०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत केएसबीने मजबूत आणि गतिमान कामगिरी केली आहे, ज्यामध्ये ठोस वाढ आणि धोरणात्मक प्रगती दिसून येते.या तिमाहीत मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्याने, आम्ही वर्षभरात ही गती टिकवून ठेवण्यासाठी चांगल्या स्थितीत आहोत.

वीज, सौर, सांडपाणी, अणुऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स या आमच्या प्रमुख व्यवसाय विभागांमध्ये सातत्याने वाढत असलेल्या मागणीमुळे आम्हाला अधिक प्रोत्साहन मिळाले आहे. निर्यात व्यवसायात वाढ होत आहे, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत आमचा ठसा अधिक बळकट होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, आमच्या सांडपाणी विभागाने वर्षानुवर्षे प्रभावी वाढ साध्य केली आहे आणि आमचा सौर विभाग शाश्वत उपायांसाठी आमच्या वचनबद्धतेनुसार स्थिरपणे प्रगती करत आहे.

पुढे पाहता,शाश्वत विकासासाठी आमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी सुसंगत राहून उत्कृष्टता , नवोपक्रम आणि आमच्या सर्व भागधारकांसाठी शाश्वत मूल्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत,”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments