पुणे, 10 ऑगस्ट: तुळशीबाग येथील श्री गजानन मंडळ ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवाच्या वासापूजन सोहळ्याची सुरुवात मोठ्या दिमाखात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडली.
या नंतर मंडळाचे अध्यक्ष सागर सुनील दहीभाते व सर्व पदाधिकाऱ्यांनी तुळशीबागेतील व्यापारी बांधवांना स्टीलचे ग्लास व रोजनिशी वही चे वितरण करण्यात आले. याचा मुख्य उद्देश प्लास्टिक ग्लास मुळे आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांपासून संरक्षण करणे आणि पर्यावरण पूरक संस्कृतीचा प्रसार करणे आहे.
यावेळी आमदार हेमंत रासने,भारतीय जनता पक्ष पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, मानाचा तिसरा गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी, मानाचा चौथा गणपती ट्रस्टचे ट्रस्टी भाऊ कावरे तसेच प्रसिद्ध मूर्तिकार विवेक खटावकर , जिलब्या मारुती मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ धावडे, बाबू गेनू मंडळ अध्यक्ष बाळासाहेब मारणे तसेच मंडळाचे सदस्य अरविंद तांदळे, मल्लेश कांबळे, सिद्धार्थ सातपुते, नरेश तडका यांची विशेष उपस्थिती होती.
या वर्षी मंडळाने “विष्णुधाम” देखावा सादर करणार आहे. या देखाव्यात भगवान विष्णू यांची मूर्ती व दशावतार पाहायला मिळणार आहेत. तसेच पहाटे 4 वा. सुप्रभातम आरती होईल. त्या नंतर भाविकांना तुळशीमाळा देण्यात येणार आहे. विविध प्रकाशयोजना,खास दक्षिण भारतातून बोलावलेले शास्त्रीय वादक आणी पुजारी असणार आहेत. या साज शृंगारामुळे भक्तांना आध्यात्मिक लोकात वावरल्याचा अनुभव येणार आहे , अशी संकल्पना या देखाव्यामागे आहे.


