Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedसचिन महाराज पवार यांना केशव सन्मान पुरस्कार केशव शंखनाद पथक...

सचिन महाराज पवार यांना केशव सन्मान पुरस्कार केशव शंखनाद पथक ९ वा वर्धापन दिन आणि केशव सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा : संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि किशोर चव्हाण यांची उपस्थिती

पुणे : केशव शंखनाद पथकाच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त केशव सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत साहित्याचे युवा अभ्यासक आणि ख्यातनाम वक्ते ह.भ.प.सचिन महाराज पवार यांना केशव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार दिनांक १७ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे, अशी माहिती केशव शंखनाद पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला केशव शंखनाद पथकाचे संस्थापक अध्यक्ष नितीन महाजन, सचिव रणजित हगवणे, व्यवस्थापक काळूराम डोमाळे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे हे असणार आहेत. तर, विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. समाजात संघटितपणे आणि समर्पित वृत्तीने धार्मिक काम करणा-या व्यक्तीला केशव शंखनाद पथक पुरस्कार देण्यात येतो. सचिन महाराज पवार यांनी कीर्तनाच्या माध्यमातून संतांची शिकवण आणि संत परंपरा जनसामान्यात रुजविण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, व ११०००/- रुपयाचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

नितीन महाजन म्हणाले, हिंदुस्थानातील पहिले आणि एकमेव शंख वादकांचे केशव शंखनाद पथक आहे. गणेशोत्सवात शंखनाद करण्याच्या उद्देशाने २०१७ मध्ये शंखनाद पथकाचा सराव ओंकारेश्वर मंदिरात सुरू झाला. त्यावेळी संख्या अगदीच कमी होती. आम्ही शंखनादाविषयी मार्गदर्शन करित आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदे सांगून लोकांमध्ये जनजागृती केली. त्यानंतर शंख वादकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. धार्मिक, पौराणिक वाद्यांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे त्याचा प्रसारक करण्याच्या उद्देशाने संस्थेच्या वतीने मोफत शंख वादन प्रशिक्षण वर्ग देखील सुरू झाले, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments