Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्राम स्तरावर मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणीस कृषि विभागामार्फत अर्थ सहाय्य 18...

ग्राम स्तरावर मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणीस कृषि विभागामार्फत अर्थ सहाय्य 18 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि. 11 : राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत मृद आरोग्य व सुपिकता कार्यक्रम सन २०२५-२६ मध्ये ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळा गाव पातळीवर ग्राम स्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणी करिता योग्य व्यक्ती, संस्थेद्वारा प्रस्ताव, अर्ज 18 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन कृषि अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण १५ मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा उभारावयाच्या आहेत, शिरूर व जुन्नर तालुक्यात प्रत्येकी २ व उर्वरित ११ तालुक्यामध्ये प्रति तालुका १ प्रयोगशाळांच्या उभारणीस शासनाद्वारे अर्थ राहाय्य देण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणीस शासनातर्फे १.५० लाख रुपये अर्थ सहाय्य देण्यात येईल.

वैयक्तिकरित्या मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणी करणाऱ्या युवक-युवत्तीचे यय १८ ते २७ वर्ष यादरम्यान असावे. लाभार्थी उद्योजक विज्ञान आणि संगणकाचे ज्ञान असलेला १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदार, उद्योजक गटाकडे स्वत:ची किंवा किमान चार वर्षासाठी भाडेपट्टा करारासह भाड्याने घेतलेली इमारत असावी. शेतकरी उत्पादक संस्था, कृषि चिकित्सालय आणि कृषि व्यवसाय केंद्रे कृषि आवश्यक, माजी सैनिक, बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था गट, शेतकरी सहकारी संस्था, किरकोळ निविष्ठा विक्रेते आणि शाळा, कॉलेज युवक, युवती हे अर्ज, प्रस्ताव सादर करू शकतात.
अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा कृषी उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, पुणे-येथे संपर्क साधावा असेही प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments