पुणे,12 ऑगस्ट 2025 : पुणेस्थित केके केअर हॉस्पिटलने जगातील सर्वांत अद्ययावत नॉन-सर्जिकल (शस्त्रक्रियेविना) आर्थोपेडिक्स उपचार प्रदान करण्यासाठी आर्थोरिन्यू सोबत सहयोग केला आहे. आर्थोरिन्यू हे अमेरिकास्थित रिजेनेक्स युएसए चे भारतातील अधिकृत प्रतिनिधी आहेत. रिजेनेक्स युएसएची स्थापना 20 वर्षांपूर्वी झाली असून त्यांनी जगभरात 5,20,000 हून अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केले आहेत. तसेच हे अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी एक विश्वासार्ह पर्याय ठरले आहे. मुंबईस्थित आर्थोरिन्यू ने केके केअर हॉस्पिटलसोबत केलेल्या सहयोगामुळे लोकांना स्वत:च्या शरीराच्या पेशी वापरून शक्य असेल तिथे शस्त्रक्रिया टाळत विविध सामान्य आर्थोपेडिक समस्यांवर उपचार घेता येणार आहेत,ही माहिती पत्रकार परिषदेत भूलतज्ञ व वेदना व्यवस्थापन तज्ञ आणि केके केअर हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.वर्षा कुऱ्हाडे, वेदना व्यवस्थापन तज्ञ डॉ.माधुरी लोकापूर,लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.श्रीकांत कुऱ्हाडे आणि आर्थोपेडिक सर्जन डॉ.तुषार चौधरी यांनी दिली. याप्रसंगी फिजिशियन डॉ.महावीर सतीशचंद बगरेचा व आर्थोरिन्यूचे दिगांत देसाई उपस्थित होते.
भूलतज्ञ व वेदना व्यवस्थापन तज्ञ आणि केके केअर हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.वर्षा कुऱ्हाडे म्हणाल्या की, हा सहयोग अस्थि स्नायूंच्या (मस्क्युलोस्केलेटल) स्थितींच्या समस्यांवरील उपचारांसाठी अद्ययावत इंटरव्हेंशनल आणि विना शस्त्रक्रिया पर्याय प्रदान करेल. रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये विविध उपचार योजनांचा समावेश आहे,त्यांचे पेटंट रिजेनेक्स युएसए कडे असून यामध्ये सुपर कॉन्स्ट्रेटेड प्लेटलेटस आणि मेसेनकायमल पेशी (हाडे व कुर्चाशी जोडलेल्या पेशी) वापरल्या जातात.
त्या पुढे म्हणाल्या की, विविध प्रकारच्या खेळांमुळे होणाऱ्या दुखापती, सॉफ्ट टिश्यूज, अस्थिबंध, तंतूमय उती, स्नायू लचकणे आणि स्नायू मुरगळणे (मेनिस्कस), हाडांमधील प्राथमिक टप्प्यातील झीज यासारख्या स्थितींवर या प्रक्रियांद्वारे उपचार केले जाऊ शकतात. यामध्ये प्लेटलेट प्लाझ्माचे प्रमुख स्त्रोत असलेल्या मेसेनकायमल पेशींमधून रक्ताचा नमूना काढला जातो व त्यानंतर रक्ताच्या नमुना वर लॅबमध्ये प्रक्रिया करून आणि लोकल ॲनेस्थेशिया देऊन ते परत शरीरात टाकले जातात, जेणे करून शरीरातील स्वउपचार यंत्रणा उत्तेजित होते. प्लेटलेटसचे केंद्रीकरण हे नियमित पीआरपीपेक्षा 30 पट जास्त असते. या तंत्रज्ञानाला युएस एफडीएची मान्यता आहे.
भारतात 18 ते 89 वगयोगटातील रूग्णांवर रिजनरेटिव्ह प्रक्रिया करण्यात आली असून अस्थिस्नायूंच्या विविध समस्या (मस्क्युलोस्केलेटल) असलेल्या रूग्णांसाठी ही प्रक्रिया अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे.
आजकालच्या निदान पध्दतींमध्ये एक्स-रे, एमआरआय व्यतिरिक्त सोनोग्राफी करण्याचा कल वाढत चालला आहे. जेव्हा एखादा रूग्ण ओपीडी मध्ये येतो, तेव्हा सोनोग्राफीच्या मदतीने नेमके कोणत्या भागात वेदना होत आहे, ते स्थान शोधता येते,उदा.जर एखाद्याच्या खांद्याला वेदना होत असतील तर आपण त्या व्यक्तीला त्याचे खांदे हलवण्यास सांगू आणि स्नायूंमध्ये वेदना सुरू होण्याची नेमकी जागा शोधू म्हणजेच अशा प्रकारे आपण अचूकपणे जागा शोधू शकतो.
हे करत असताना कोणत्याही प्रकारच्या उपचारानंतर शरीराची हालचाल इष्टतम राखण्यासाठी फिजिओथेरपीची महत्त्वाची भूमिका ही कायम आहे.
इंटरव्हेंशनल ऑर्थोपेडिक्स आणि वेदना व्यवस्थापन (पेन मॅनेजमेंट) – भविष्यातील सुपर स्पेशालिटी
चार दशकांपूर्वी पेन मॅनेजमेंट सोसायटी ही अस्तित्वात आली. डॉ.वर्षा यांच्या मते, अजूनही भारतात वेदना व्यवस्थापन याबाबत जागरूकता नाही. वृध्द व्यक्तींची वाढती लोकसंख्या,खेळाडूंची वाढती संख्या आणि त्यांना होणाऱ्या दुखापती,असामान्य वेदनांना कारणीभूत असलेल्या दीर्घकालीन आजारांमध्ये वाढ या सर्व बाबी लक्षात घेता वेदना व्यवस्थापन हे नजिकच्या भविष्यात भारतातील एक प्रमुख सुपर स्पेशालिटी म्हणून उदयास येईल. आज प्रत्येक घरामध्ये एखाद्या व्यक्तीला तरी कुठल्या ना कुठल्या तरी वेदना होत असतात, मात्र पेन फिजिशियन्सचे प्रमाण हे खूप कमी आहे.
केके केअर हॉस्पिटल हे मल्टीस्पेशालिटी सुविधा असून याचे चऱ्होली आणि आळंदी येथे दोन युनिट आहेत.


