Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedराज्यस्तरीय रेड रन मिनी मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे यश

राज्यस्तरीय रेड रन मिनी मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे यश

पुणे दि.12 :- राज्यस्तरीय रेड रन मिनी मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक तथा उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे मंडळ डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 10 ऑगस्ट रोजी 17 ते 25 वयोगटाकरिता 5 किलो मीटर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालयाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय ‘रेड रन मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेमधील अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक विजेते व जिल्हा प्रश्नमंजुषा प्रथम क्रमांक विजेत्यांना जिल्ह्यांचे प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले.

मिनी मॅरेथॉन क्रिडा प्रकारामध्ये मुलींच्या गटात जिल्ह्यातील वाघोली येथील जैन संघटना महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी मानसी यादव भारती हिने प्रथम क्रमांक पटकावला तसेच मुलांच्या गटामध्ये पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार गणेश आठवले यांने व्दितीय क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये 13 ते 17 वयोगटात हडपसर येथील साधना विद्यालयाचा विद्यार्थी कुमार यश गर्जे यांने प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये व्दितीय क्रमांक पटकावला आहे, असेही डॉ. यमपल्ले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments