पुणे दि.12 :- शांघाई येथे सन 2026 मध्ये आयोजित होणा-या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औदयोगिक आस्थापना यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य तसेच देश पातळीवर करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष आहे.
सर्व शासकीय आणि खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई, दूल रुम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविदयालये, तंत्रनिकेतन महाविदयालये, आयएचएम/हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूट्स, कॉर्परिट टेक्निकल इन्स्टिट्यूट, स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विदयापीठ, एमएसबीवीईटी, खाजगी कौशल्य विदयापीठ, फाइन आर्टस कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग तसेच इतर सर्व महाविदयालये व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था मधील उमेदवारांना स्पर्धेकरिता नोंदणी करता येईल.
इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in/ या वेबपोर्टलला भेट देऊन 30 सप्टेंबर 2025 पूर्वी नाव नोंदणी करावी. जिल्हयातील सर्व संबंधित संस्थांनी पुढाकार घेऊन कौशल्य स्पर्धेबाबतची माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी असे, आवाहन सा.बा. मोहिते, प्र. सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवर कौशल्य स्पर्धेचे आयोजन
RELATED ARTICLES


