नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2025: ULT POWER SOUND सीरिजमधील अधिक ऍडव्हान्स्ड लाइनअपचे सोनी इंडियाने आज उद्घाटन केले. या नवीन श्रेणीमध्ये वायरलेस पार्टी स्पीकर्स ULT TOWER 9 आणि ULT TOWER 9AC, वायरलेस ब्लूटूथ स्पीकर्स ULT FIELD 5 आणि ULT FIELD 3 तसेच ULTMIC1 या वायरलेस ड्युअल माइकचा समावेश आहे. या सर्व स्पीकर्समध्ये मजबूत बाससाठी ULT बटण देण्यात आले आहे, जे वेगवेगळ्या साउंड मोडसह आवाज वाढवून दमदार आवाज देते.
सोनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील नय्यर यांनी ULT POWER SOUND अंतर्गत या नवीन उत्पादनांबद्दल अत्यंत उत्साहात माहिती दिली. ते म्हणाले, “आमच्या ग्राहकांचा ऐकण्याचा अनुभव अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी नवनवीन ऑडिओ उत्पादने देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ULT POWER SOUND सीरिजमधून आमचा हाच दृष्टिकोन समोर येतो. ULT POWER SOUND शक्तिशाली बास इफेक्ट आणि इमर्सिव्ह ध्वनी देते. करण औजलासोबतच्या सहकार्याबद्दल ते म्हणाले, “ULT श्रेणीसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून करण औजलाचा समावेश झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. तरुणांसोबतचे त्यांचे कनेक्शन आमच्या ब्रँडला साजेसे आहे. आमच्या उत्पादनांच्या माध्यमातून प्रत्येक श्रोत्यापर्यंत लाईव्ह परफॉर्मन्सचा अनुभव पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे ते खरोखरच संगीताचा आनंद घेऊ शकतील.”
सोनी इंडियाचे ऑडिओ ब्रँड अॅम्बेसेडर करण औजला म्हणाले, “सोनीच्या नवीन, अनोख्या ULT POWER SOUND लाइनअपचा भाग असण्याचा मला खूप आनंद आहे. ULT POWER SOUND श्रेणीतील उत्पादनांमुळे संगीत अनुभवण्याच्या आनंदात अधिकच भर पडते. मनाला शांतता देणारा, मनाचा तळ ढवळून काढणारा बास तसेच अत्यंत स्पष्ट आवाज यामुळे मिळतो. मी प्रवासात असलो किंवा घरी असलो तरी, ULT POWER SOUND उत्पादने अगदी बारकाईने सगळे तपशील व्यवस्थित पोहोचवतात. याच्या आवाजाची गुणवत्ता तर पूर्वी कधीही अनुभवलेली नाही, अशी आहे.”
1. अल्ट्रा टॉवर 9 – घरातच मिळवा लाईव्ह कार्यक्रमाचा अनुभव
ULT TOWER 9 आणि ULT TOWER 9AC अशा दोन प्रकारांमध्ये ULT TOWER येतो. कोणत्याही जागेला उच्च-ऊर्जा मनोरंजन केंद्रात परावर्तित करण्याची ताकद त्यांच्यात आहे. प्रत्येक मॉडेलमध्ये ULT POWER SOUND तर आहेच पण बास मोड (ULT1 आणि ULT2) देखील तुम्ही निवडू शकता. याशिवाय इमर्सिव्ह 360° पार्टी साउंड आणि 360° पार्टी लाईट कोणतीही जागा एकदम पार्टी मूडमध्ये बदलू शकतात. तुम्ही माइकवर कराओकेसह गाणे गात असाल, गिटारवर हात साफ करत असाल किंवा टीव्ही साउंड बूस्टरसह तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचा आनंद घेत असाल, ULT TOWER 9 तुमच्या मनोरंजनाच्या गरजा सहजपणे आत्मसात करतो आणि त्यांच्याशी जुळवून घेत तुमचा आनंद अधिकच वाढवतो. ग्राहकांची सोय विचारात घेऊन डिझाइन केलेले, पोर्टेबिलिटीसाठी बिल्ट-इन हँडल आणि कास्टर, टिकाऊपणासाठी वॉटर-रेझिस्टंट टॉप पॅनेल तसेच तुमचे डिव्हाइस चार्ज ठेवण्यासाठी बिल्ट-इन पॉवर बँक याचाही यात समावेश आहे. साउंड फील्ड ऑप्टिमायझेशनची देखील सोय यात आहे. जे सभोवतालच्या आवाजाशी जुळवून घेत पार्टी कनेक्टद्वारे जवळपास 100 पर्यंत स्पीकर्स कनेक्ट करण्याची क्षमता देते.
ULT TOWER 9 आणि ULT TOWER 9AC कसे वेगळे ठरतात?
ULT TOWER 9: जलद चार्जिंगसह 25-तासांचे प्रभावी बॅटरी लाइफ, यामुळे बराच काळ चालणाऱ्या पार्ट्यांसाठी अत्यंत सोयीचे.
ULT TOWER 9AC: प्लग-अँड-प्ले स्वरूपात दमदार आवाज आणि इतर वैशिष्ट्ये मिळतात. यामुळे घरी किंवा प्रवासात दिवसभर तुम्ही पार्टी मोड ऑन ठेवू शकता.
2. ULT FIELD 5 – कॉम्पॅक्ट तरीही शक्तिशाली
शक्तिशाली बाससह एक कॉम्पॅक्ट स्पीकर असलेल्या ULT FIELD 5 सह प्रवासात तुमच्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. मल्टी-वे स्ट्रॅपसह सोयीसाठी डिझाइन करण्यात आलेला हा स्पीकर वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ तसेच शॉकप्रूफ आहे. यामुळे तो कोणत्याही कार्यक्रमासाठी अत्यंत योग्य ठरतो. दीर्घकाळ चालणाऱ्या त्याच्या बॅटरीमुळे संगीताचा आनंद जास्त काळ घेता येतो. वेगवान आयुष्यासाठी डिझाइन केलेले Sony ULT FIELD 5 कोणत्याही कार्यक्रमासाठी तयार मजबूत आणि कॉम्पॅक्ट स्पीकरच्या माध्यमातून शक्तिशाली बासचा अनुभव देते. ULT POWER SOUND सह खोल, उत्तम आवाजाचा आनंद देते. तर 10 बँड कस्टम इक्वेलायझर तुम्हाला तुमचा आवाज फाइन-ट्यून करू देते. 25 तासांचे बॅटरी लाईफ, मल्टी-वे स्ट्रॅप, पाणी, धूळ, शॉक आणि खाऱ्या पाण्यापासून संरक्षणासाठी IP67 रेटिंगसह, ULT FIELD 5 तुम्ही जिथे जाल तिथे परफॉर्म करण्यासाठी तयार केले आहे. साउंड फील्ड ऑप्टिमायझेशनमुळे गोंगाट असला तरीही आवाज स्पष्ट येतो आणि मल्टी-डिव्हाइस कनेक्शनसह, तुम्ही विना अडथळा संगीत ऐकण्यासाठी दोन डिव्हाइसेसमध्ये सहजपणे स्विच करू शकता. तुम्ही हायकिंग करत असाल, समुद्रकिनाऱ्यावर आराम करत असाल किंवा अचानक पार्टी थ्रो करण्याचा विचार करत असाल, तर पार्टी कनेक्टद्वारे १०० पर्यंत स्पीकर्स कनेक्ट करू शकता आणि सोनी | साउंड कनेक्ट ऍपसह तुमचा अनुभव अधिक समृद्ध करा. कारण दमदार आवाज स्थिर असला तर अपील होत नाही.
3. ULT FIELD 3 – शक्तिशाली आवाज. तो तुमचा स्वतःचा असावा
कॉम्पॅक्ट, शक्तिशाली आणि तुम्ही जाल तिथे वागवण्यासाठी योग्य अशा पद्धतीने डिझाइन केलेले, Sony ULT FIELD 3 ULT POWER SOUND गूढ, दमदार बासचा अनुभव देते. 24 तासांपर्यंत बॅटरी लाइफ, मल्टी-वे स्ट्रॅप आणि IP67-रेटेड वॉटर आणि डस्ट-रेझिस्टंट बिल्डसह, प्रवासासाठी तो तुमचा योग्य साथीदार आहे. 10 बँड कस्टम इक्वेलायझरसह तुम्ही तुमचा ऑडिओ फाइन-ट्यून करत असाल, साउंड फील्ड ऑप्टिमायझेशनद्वारे आवाजाचा आनंद घेत असाल किंवा मल्टी-डिव्हाइस कनेक्शनसह दोन डिव्हाइसेस विना अडथळा कनेक्ट करत असाल तर ULT FIELD 3 तुमच्या जगण्यासाठी अत्यंत योग्य आहे. पार्टी कनेक्ट वापरून 100 पर्यंत सुसंगत स्पीकर्स लिंक करून आवाजाचा एक उत्तम अनुभव घेऊ शकता. आणि सोनी | साउंड कनेक्ट ऍपसह हे सर्व लीलया नियंत्रित करा. या प्रभावी आणि दमदार आवाजासह तुम्ही कुठेही जाऊ शकता आणि तुम्हाला हवा तसा आवाज तुम्ही ULT FIELD 3 च्या साहाय्याने अनुभवू शकता.
4. ULTMIC1 – तुमच्या आवाजाची पोहोच वाढवा
ULTMIC1 सह तुमचा आवाज जिवंत करा. अविस्मरणीय परफॉर्मन्ससाठी परिपूर्ण असा हा वायरलेस मायक्रोफोन आहे – मग तो कराओके नाईट असो, जॅम सेशन असो किंवा उत्स्फूर्त गाणे असो. आसपासचा आवाज अत्यंत कमी येईल याची खात्री करत स्पष्ट, शक्तिशाली व्होकल्स देण्यासाठी तयार करण्यात आलेला ULTMIC1 तुमचा आवाज अत्यंत स्पष्ट येईल, याची खात्री करते. ड्युएट असिस्ट फीचर असलेल्या या माइकमध्ये ड्युअल परफॉर्मन्स दरम्यान माइकचा आवाज आपोआप संतुलित होतो. जेणेकरून कोणताही आवाज हरवणार नाही. प्लग अँड प्ले कनेक्टिव्हिटीसह, तुमचे डोंगल तुमच्या ULT पार्टी स्पीकरच्या माइक जॅकशी कनेक्ट केलेत की तुम्ही परफॉर्मन्ससाठी तयार. 20 तासांचा माइक प्ले-टाइम, फक्त 10 मिनिटांत 120 मिनिटे एवढे वेगवान चार्जिंग आणि चार्जिंगचा त्रास होऊ नये यासाठी उपयुक्त USB चार्जिंगची देखील सोय आहे. कॉम्पॅक्ट, रिस्पॉन्सिव्ह आणि परफॉर्मन्स-रेडी, ULTMIC1 संगीताचा उत्तम अनुभव देते आणि त्यामुळेच नेहमीच तुमच्यावर स्पॉटलाइट राहतो.
उपलब्धता आणि किंमत
नवीन ULT POWER SOUND उत्पादने (ULT TOWER 9, ULT TOWER 9AC, ULT FIELD 5, ULT FIELD 3, आणि ULTMIC1) सर्व सोनी – सोनी सेंटर आणि सोनी एक्सक्लुझिव्ह रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत. www.ShopatSC.com पोर्टल, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि भारतातील अन्य ई-कॉमर्स पोर्टल्सवरही ती मिळू शकतात.
विशेष लाँच ऑफर म्हणून, ULT TOWER 9 आणि ULT TOWER 9AC खरेदी करणाऱ्या ग्राहकांना रु. 19,990/- (MRP) किमतीचा सोनी वायरलेस MIC मिळेल.
मॉडेल
योग्य किंमत (in INR)
उपलब्धता
रंग
ULT TOWER 9
84,990/-
12 ऑगस्ट 2025 पासून
काळा
ULT TOWER 9AC
69,990/-
12 ऑगस्ट 2025 पासून
काळा
ULT FIELD 5
24,990/-
सध्या उपलब्ध
ऑफ व्हाईट आणि काळा
ULT FIELD 3
17,990/-
सध्या उपलब्ध
फॉरेस्ट ग्रे, ऑफ व्हाईट आणि काळा
ULTMIC1
14,990/-
सध्या उपलब्ध
काळा


