Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रसंत पू गोविंद देव गिरी स्वामी जी यांचेकडून श्री जयंत काका देशपांडे...

राष्ट्रसंत पू गोविंद देव गिरी स्वामी जी यांचेकडून श्री जयंत काका देशपांडे यांचा सत्कार आणि गिरवी मंदिरास देणगी

अलिकडेच 75 वर्षे मध्ये पदार्पण केलेले गिरवी गोपाळ कृष्ण मंदिरचे विद्यमान उत्तराधिकारी श्री जयंतकाका यांना त्यांचे अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याबद्दल पू गोविंद देव गिरी स्वामी जी यांनी शाल श्रीफळ आणि यथोचित दक्षिणा देऊन गौरविले आणि आशीर्वाद दिलेगोपाळ कृष्ण मंदिर गिरवी हे पू स्वामीजी व अनेक जेष्ठ सत्पुरुषांचे श्रद्धास्थान आहे मंदिरास दिव्य इतिहास लाभला असून अलिकडे जीर्णोद्धार झाला आहे त्या नंतर अनेक वैदिक अनुष्ठाने आणि लिखित नाम जप गीता व विष्णू सहस्र नाम पठण तसेच हरीपाठ आणि भागवत सप्ताह असे अनेक उपक्रम सातत्याने सुरू आहेत भक्ती मार्ग प्रचार आणि प्रसार केला जात असून श्री जयंत काका यांचे अध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ देश विदेशातील साधकांना होत आहे
या पवित्र आणि अतिशय जागृत स्थानी साधकांनी अवश्य जाऊन दर्शन उपासना आणि सेवा करावी आणि आपले आत्म कल्याण साधावे असेही आवाहन सत्पुरुष करीत असतातमंदिराच्या या समाजोपयोगी व भरीव कार्याचे कौतुक करून पू गोविंद देव गिरी स्वामी यांनी मंदिरास एक लक्ष रुपये देणगी दिली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments