या विक्रीत नॉन मेट्रो शहरांचा 83% पेक्षा जास्त वाटा
आंध्र प्रदेश, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, झारखंड, तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्राने सर्वाधिक वाढ नोंदवली
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2025 | स्नॅपडीलवरील नुकत्याच संपलेल्या स्वागततंत्र सेलने संपूर्ण भारतातील शॉपिंग कार्ट उजळून निघाले. यामुळे उत्सवाच्या हंगामाचा आनंद सर्वांना लुटता आला. गेल्या वर्षी याच काळात विक्री झालेल्या युनिट्सच्या संख्येत 100% पेक्षा जास्त वाढ झाली. लाखो भारतीय कुटुंबांमध्ये मूल्य, वैविध्य आणि विश्वास कसा झिरपत गेला आहे याचेच हे प्रतिबिंब आहे.
या वर्षीचा सेल हा रोज वापरता येतील अशा फॅशन आणि सणासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचा उत्सव होता. 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या स्वागततंत्र सेलमध्ये फॅशनेबल गोष्टींच्या मागणीत वाढ झाली. फॅशनेबल युनिट्सची तिप्पट विक्री झाली. सणासुदीसाठी भेटवस्तू – सुक्या मेव्याचे प्रमाण चौपट झाले. पावसाळी कपड्यांच्या खरेदीतही 450% पेक्षा जास्त वाढ झाली. जी सध्या सुरू असलेल्या पावसाळी हंगामाची चाहूल देते.
नॉन मेट्रो शहरांमधील खरेदीदारांनी यावेळी जमके खरेदी करत उत्सवाच्या हंगामातील विक्रीत ८३% चे योगदान दिले. आंध्र प्रदेश, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, झारखंड, तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्र ही राज्ये याना स्टार परफॉर्मर्स ठरली.
स्वागततंत्र सेल हा विक्रेत्यांसाठी देखील एक उत्सव होता. सक्रिय विक्रेत्यांमध्ये 176% वाढ झाल्याने सूरत हे विक्रेत्यांचे सर्वात मोठे केंद्र म्हणून समोर आले. त्या खालोखाल नवी दिल्लीला मागणी होती. नोएडा, जयपूर, लुधियाना, कानपूर, जोधपूर आणि राजकोट सारख्या इतर शहरांमधील विक्रेत्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी होती. 2017 किंवा त्यापूर्वी सहभागी झालेल्या दीर्घकालीन भागीदारांचा एकूण विक्रीत 20% वाटा होता, तर 2024 आणि 2025 मध्ये समाविष्ट झालेल्या विक्रेत्यांचा वाटा 32% होता. या दोन्ही गटांमध्ये चांगली वाढ दिसली.
या सेलबद्दल स्नॅपडीलचे सीईओ अचिंत सेतिया म्हणाले: “भारतातील सणांचा काळ हा केवळ खरेदीचा काळ नसतो तर हा कुटुंबांसाठी तयारी करण्याचा, भेटवस्तू देण्याचा आणि एकत्र वेळ घालवण्याचा काळ असतो. ट्रेंडी, दर्जेदार उत्पादने भारताला परवडतील अशा किमतीत उपलब्ध करून देत स्वागततंत्र सेलने ही भावना जिवंत केली. ग्राहक आणि विक्रेते दोघांकडून आम्हाला मिळणार प्रतिसाद हा पुढील उत्सवांसाठी उत्तम वातावरण निर्मिती करतो.”
स्वागततंत्र सेल हा मूल्य, शैली आणि परंपरांवरील भारताच्या प्रेमाचा उत्सव होता. जो ग्राहक आणि विक्रेत्यांना एका सामायिक भावनेतून एकत्र आणतो. ग्राहकांची वाढती मागणी आणि विक्रेत्यांचा वाढता सहभाग ही पुढील हंगामाची नांदी आहे.


