Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedदहाव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2024 स्पर्धेत मनप्रीत अँड जीजीज...

दहाव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2024 स्पर्धेत मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स, कपिला परमार ऑल स्टार्स यांची आगेकूच

पुणे, 16 फेब्रुवारी 2024 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने आयोजित दहाव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2024 स्पर्धेत साखळी फेरीत मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स, फोर ओक्स सेलर्स, कपिला परमार ऑल स्टार्स या संघानी आगेकुच केली.

पुना क्लब क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत रौनक ढोले पाटील(31धावा व 1-12) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर फोर ओक्स सेलर्स संघाने वॉरियर्स संघाचा 3धावांनी पराभव करत तिसऱ्या विजयाची नोंद केली. दुसऱ्या सामन्यात आधिश शहा नाबाद 48 धावांच्या जोरावर ओबेरॉय आणि नील किंग्स संघाने पृथ्वी लायन्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत तिसरा विजय नोंदवला.

अन्य लढतीत भार्गव पाठक नाबाद 38 धावा व 1-10) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाने जेट्स संघाचा 8 गडी राखून सलग चौथा विजय नोंदवला. क्रिश शहा नाबाद 59धावा व 2-3)याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर जीएम टायफून्स संघाने तलब टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला.

निकाल: साखळी फेरी:
फोर ओक्स सेलर्स: 6 षटकात 4बाद 70धावा(रौनक ढोले पाटील 31(11,4×6), तारिक 13, झियान तालब 2-8, आरव विज 2-11) वि.वि. क्वालिटी वॉरियर्स: 6 षटकात 5बाद 67धावा (झियान तालब 27(11, 3×6), टोनी शेट्टी नाबाद 15, आरव विज 12, तारिक 2-7, रौनक ढोले पाटील 1-12); सामनावीर – रौनक ढोले पाटील; फोर ओक्स सेलर्स संघ 3 धावांनी विजयी;

लायन्स: 6 षटकात 2बाद 75धावा(खालिद परवानी नाबाद 38(15,3×4,3×6), वरुण 25(15,3×4), अमन पारेख 1-6) पराभुत वि.ओबेरॉय आणि नील किंग्स:6 षटकात 1बाद 78धावा (आधिश शहा नाबाद 48(21,4×4,2×6), अरुण खट्टर नाबाद 27(14,1×4,2×6), रजत श्रॉफ 1-3); सामनावीर – आधिश शहा; ओबेरॉय आणि नील किंग्स संघ 7 गडी राखून विजय;

जेट्स: 6 षटकात 5बाद 61धावा(पुनीत सामंत 28(18,3×4), चिराग लुल्ला 11, धवल गुंदेचा 12, अर्शद अक्कलकोटकर 1-11, सौरभ सिंग 1-5, भार्गव पाठक 1-10)पराभुत वि. मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स: 4.2 षटकात बिनबाद 64धावा(भार्गव पाठक नाबाद 38(14,3×4,3×6), सिद्धांत धर्मा नाबाद 25(12,3×4,1×6));सामनावीर -भार्गव पाठक; मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघ 8 गडी राखून विजयी;

तलब टायटन्स: 6 षटकात 4बाद 75धावा(करण नाबाद 35(18,2×4,3×6), अरुण खट्टर 23(9,3×6), वेद ओसवाल 2-22, क्रिश शहा 2-3)पराभुत वि. जीएम टायफून्स: 5.5 षटकात 3बाद 76धावा(क्रिश शहा नाबाद 59(24,4×4,5×6), पवन कटारिया नाबाद 12 ,अरुण खट्टर 3-3); सामनावीर-क्रिश शहा; जीएम टायफून्स संघ 5 गडी राखून विजयी;

ईगल्स: 6 षटकात 4बाद 72धावा(प्रतिक 31(15,2×4,2×6), अनमोल लिमये 20, वरुण तेलंग 2-7)पराभुत वि.व्हीएनएन वुल्व्हस: 5.5षटकात 2बाद 73धावा(तुषार आसवानी नाबाद 49(19,5×4, 3×6), विक्रम दामले 21(14,1×4,1×6), रोहन टोपे 1-13);सामनावीर-तुषार आसवानी; व्हीएनएन वुल्व्हस संघ 6 गडी राखून विजयी;

व्हीके टायगर्स: 6 षटकात 3बाद 73धावा(किरण देशमुख 25 (13,3×4,1×6), राजेश बनसोडे 20, विक्रम काकडे 10, युवल गुलाटी नाबाद 10, प्रकाश कारिया 1-9)वि.वि.कपिला परमार ऑल स्टार्स: 6 षटकात 3बाद 70धावा(प्रकाश कारिया 34(17,4×4,1×6), मेहुल ओसवाल नाबाद 16, कुणाल बोरावके 1-14);सामनावीर-किरण देशमुख; व्हीके टायगर्स संघ 3 धावांनी विजयी

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments