Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedटोयोटा मोटर्सची कॅम्री हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल – स्प्रिंट एडिशन दाखल

टोयोटा मोटर्सची कॅम्री हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल – स्प्रिंट एडिशन दाखल

2002 मध्ये भारतात पदार्पणापासून टोयोटा कॅम्रीने प्रीमियम सेडान सेगमेंटमध्ये एक आदर्श निर्माण केला असून, दोन दशकांहून अधिक काळ ग्राहकांना उत्कृष्ट परफॉर्मन्स, आरामदायी अनुभव आणि आकर्षक डिझाइनने मंत्रमुग्ध केले आहे.
जागतिक स्तरावर 1982 मध्ये पदार्पण केलेली कॅम्री आज जगभरातील सेडान प्रेमींसाठी यश आणि प्रशंसेचे प्रतीक बनली आहे.
“एव्हर-बेटर कार्स” या दृष्टीकोनानुसार, टोयोटा आता भारतात कॅम्री हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल – स्प्रिंट एडिशन सादर करत आहे, जे प्रगत तंत्रज्ञान आणि गतिमान डिझाइनचा संगम साधते.
2.5L डायनॅमिक फोर्स इंजिन, ई-सीव्हीटी ट्रान्समिशन आणि उच्च क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरीसह सज्ज असलेले हे मॉडेल इंधन कार्यक्षमता वाढवते, उत्सर्जन कमी करते आणि सहज हायब्रिड ड्रायव्हिंग अनुभव देते.
उत्पादनाची प्रमुख वैशिष्ट्ये:
ड्युअल-टोन एक्सटेरियर स्टाइलिंग, इंजिन हूड, रूफ आणि ट्रंकवर मॅट ब्लॅक फिनिश टेप – ज्यामुळे कारला स्पोर्टी कॅरेक्टर मिळतो
मॅट ब्लॅक अलॉय व्हील्स – कारला दमदार आणि अॅथलेटिक लुक देतात
खास स्पोर्ट्स किट* (फ्रंट बॉडी किट, रिअर बॉडी किट आणि रिअर स्पॉयलर) – कारला डायनॅमिक आणि एअरोडायनॅमिक स्टान्स देतात
डोअर वॉर्निंग लॅम्प्स* आणि अॅम्बिएंट लाइटिंग* – सुरक्षितता आणि इंटेरियर आकर्षणात भर घालतात
अधिक स्पोर्टी बाह्य डिझाइनसह पूर्वीप्रमाणेच आराम, सुरक्षितता आणि हायब्रिड कार्यक्षमता
पाच रंगांमध्ये उपलब्ध, भारतभर एकसमान एक्स-शोरूम किंमत – ₹48,50,000/-
[*अॅक्सेसरीज थर्ड पार्टीद्वारे विकसित व अधिकृत डीलर्समार्फत बसविलेल्या आहेत]

पुणे,१८ ऑगस्ट २०२५: टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. (टीकेएम) ने आज आपल्या आयकॉनिक लक्झरी हायब्रिड इलेक्ट्रिक सेडानची नवी आवृत्ती कॅम्री हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल – स्प्रिंट एडिशन दाखल केली. ड्युअल-टोन एक्सटेरियर, मॅट ब्लॅक फिनिशेस आणि एक्सक्लुझिव्ह स्पोर्ट्स किट असलेली ही कार डायनॅमिक डिझाइन आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सचा सुंदर मिलाफ आहे. स्प्रिंट एडिशन ही उत्साही व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक असून, ड्रायव्हिंगचा रोमांचक अनुभव व स्पोर्टी एलिगन्स शोधणाऱ्यांसाठी खास डिझाइन केली आहे.

लाँचवेळी आपले विचार मांडताना कंपनीच्या विक्री-सेवा-यूज्ड कार बिझनेस विभागाचे उपाध्यक्ष
श्री. वरिंदर वाधवा, उपाध्यक्ष म्हणाले की,
“ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनातून आम्ही सतत प्रगती साधत आहोत. कॅम्री स्प्रिंट एडिशन हीच त्या दृष्टिकोनाची साक्ष आहे. अधिक स्पोर्टी डिझाइन, डोळ्यात भरणारे ड्युअल-टोन स्टाइलिंग, दमदार ब्लॅक मॅट अलॉय व्हील्स आणि खास स्पोर्ट्स किटसह ही कार ग्राहकांना वेगळा अनुभव देते. आम्हाला विश्वास आहे की हा नवा व्हेरिएंट आधुनिक ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरेल आणि टोयोटाच्या शाश्वत मोबिलिटीच्या वचनबद्धतेला बळकट करेल.”
कॅम्री स्प्रिंट एडिशनची प्रमुख वैशिष्ट्ये:
पाचव्या पिढीच्या प्रगत हायब्रिड इलेक्ट्रिक तंत्रज्ञानासह सज्ज
एकूण १६९ kW (२३० PS) पॉवर आउटपुट
२५.४९ किमी/लि** सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता
इको, नॉर्मल आणि स्पोर्ट – असे ड्राइव्ह मोड्स विविध ड्रायव्हिंग गरजांसाठी
टोयोटा सेफ्टी सेन्स ३.० – प्री-कोलिजन सिस्टीम, डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल (फुल-स्पीड रेंज), लेन डिपार्चर अलर्ट, लेन ट्रेसिंग असिस्ट आणि ऑटोमॅटिक हाय बीमसह
९ SRS एअरबॅग्स, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक विथ ब्रेक होल्ड, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि ३६०° पॅनोरॅमिक व्ह्यू मॉनिटर
सोयीसाठी – १०-वे पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट (लंबर सपोर्ट व मेमरीसह), व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅडल शिफ्टर्स, वायरलेस चार्जर, हेड्स-अप डिस्प्ले, ओआरव्हीएम व टिल्ट-टेलिस्कोपिक स्टीयरिंगसाठी मेमरी सेटिंग्ज
पाच ड्युअल-टोन स्पोर्टी रंगांमध्ये उपलब्ध:
इमोशनल रेड & मॅट ब्लॅक
प्लॅटिनम व्हाईट पर्ल & मॅट ब्लॅक
सिमेंट ग्रे & मॅट ब्लॅक
प्रेशियस मेटल & मॅट ब्लॅक
डार्क ब्ल्यू मेटॅलिक & मॅट ब्लॅक
टोयोटा हायब्रिड बॅटरीवर ८ वर्षे किंवा १,६०,००० किमी (जे आधी येईल ते) वॉरंटी देत आहे, ज्यामुळे दीर्घकालीन समाधान आणि विश्वास मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments