Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्रमिक नगर येथे तृतीयपंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन*

श्रमिक नगर येथे तृतीयपंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन*

*
पुणे, दि. १६ : भोसरी विधानसभा मतदार संघ आणि समाज कल्याण विभागाच्यावतीने श्रमिक नगर, तळवडे येथे तृतीयपंथी वर्गासाठी विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मोहिमेअंतर्गत १८ नवमतदारांकडून नमुना क्र.६ चे अर्ज भरून घेण्यात आले.

नायब तहसिलदार अर्पणा देशपांडे यांनी नमुना क्रमांक ६, ७, व ८ चे अर्ज भरणे आणि त्यासोबत जोडण्यात येणाऱ्या कागदपत्राविषयी माहिती दिली. तसेच मुक्त व निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. तृतीयपंथी मतदारांना ईव्हीएम यंत्राबाबत माहिती व्हावी यासाठी मतदानयंत्र हाताळणीबाबत प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.

मोहिमेअंतर्गत एकूण ७३ नागरिकांनी मतदान प्रात्याक्षिकात सहभाग घेतला. १८ नागरिकांचे नमुना क्रमांक ६ व २ मतदारांचे नमुना क्रमांक ८ चे अर्ज भरून घेण्यात आले.यावेळी दिलीप करदुरे, सिओना साळवे आदी उपस्थित होते.

*अर्चना तांबे, स्वीप नोडल अधिकारी-* मतदार जागृतीसाठी विविध स्तरावर जनजागृती मोहिम आयोजित करण्यात येत आहे. अधिकाधिक तृतीयपंथीयांनी मतदारांनी मतदान नोंदणी करून मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा तसेच ईव्हीएम हाताळण्याविषयी प्रात्याक्षिकात सहभाग घ्यावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments