Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंग्राम बापू भंडारे यांनी समजाची माफी मागितलीच पाहिजे - उल्हास पवार*

संग्राम बापू भंडारे यांनी समजाची माफी मागितलीच पाहिजे – उल्हास पवार*

संगमनेर येथे संग्राम बापू भंडारे या कीर्तनकाराने भारतीय घटना आणि कीर्तनाची संकृती आणि परंपरा यांना न शोभणारे वक्तव्य केले असून त्यांच्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेद करतो. तसेच समाजाची त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील मी करतो. असे परखड मत जेष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
उल्हास पवार म्हणाले की, संतश्रेष्ठ ज्ञानेशवर माउली व जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्यापासून संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज यांच्यापर्यंत फार मोठी संत परंपरा आपल्याला लाभली आहे. हजारो कीर्तनकार समाजाला योग्य मार्गदर्शन करीत समाजात सत्संग वाढवत आहेत. शेकडो वर्षांच्या कीर्तन परंपरेने द्वेष, हत्या हे विचार कधीच शिकवले नाहीत. मात्र स्वतःला कीर्तनकार म्हणवून घेणारे संग्राम बापू भंडारे यांनी मात्र सर्व मर्यांदा ओलांडून पूज्य महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेचेच उदात्तीकरण केले आहे हे अतिशय संतापजनक आहे. संपूर्ण वारकरी संप्रदायाने त्यांना याचा जाब विचारलाच पाहिजे असे ते म्हणाले.
उल्हासदादा पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या वक्त्यव्याकडे गांभीर्याने पहिले पाहिजे तसेच नथुराम गोडसे सारख्या खुन्याचे उदात्तीकरण करून समाजात विकृती पसरवणाऱ्या संग्राम बापू भंडारे यांच्यावर तातडीने गुन्हा नोंदवून कारवाई केली पाहिजे. हरी भक्त परायण अशी उपाधी लावणारे हजारो कीर्तनकार आज समाजाचे भूषण आहेत यांनी देखील अशा विकृतीला कधी थारा दिला नाही. वारकऱ्यांनी देखील संग्राम बापू भंडारे यांचा निषेध करावा तरच अशा विकृतीला आळा बसेल असे उल्हास पवार शेवटी म्हणाले. उल्हास पवार हे स्वतः वारकरी संप्रदायाचे असून त्यांच्या आई पाई पंढरीला जात असत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments