पुणे, २१ ऑगस्ट २०२५ – ऑम्निऍक्टिव्ह इम्प्रुव्हिंग लाइव्ह्स फाऊंडेशन (ओआयएलएफ) आणि रंगीत यांनी पुण्यात आपला उपक्रम आणखी विस्तारित केला आहे. रंगीतचा नाविन्यपूर्ण सोशल इमोशनल अँड इकोलॉजिकल नॉलेज (एसईईके) अभ्यासक्रम व डिजिटल प्लॅटफॉर्म यामुळे अधिकाधिक मुलांना खेळाधारित, कौशल्य-केंद्रित शिक्षण मिळू शकत आहे. या शिक्षणातून मुलांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास, डिजिटल जबाबदारी, चिकाटी आणि चिकित्सक विचारसरणी यांसारखी २१व्या शतकातील आवश्यक कौशल्ये विकसित होत आहेत.
“रंगीतमध्ये आम्ही ठाम आहोत की शिक्षण हे फक्त परीक्षेपुरते नसून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी असले पाहिजे. पुण्यात इम्प्रुव्हिंग लाइव्ह्स फाऊंडेशन सोबतच्या भागीदारीमुळे आम्हाला अधिक शाळा व समुदायांपर्यंत पोहोचता येत आहे, ज्यामुळे मुलांना केवळ शैक्षणिक यशच नव्हे तर व्यक्तिमत्व विकासही साधता येतो,” असे सिमरन मुलचंदानी, सीईओ आणि सहसंस्थापक, रंगीत यांनी सांगितले.
“खरा बदल तेव्हाच घडतो जेव्हा शाश्वततेची मूल्ये आणि कल्पक शिक्षण यांची सांगड घातली जाते – आणि ही भागीदारी नेमके तेच दर्शवते. आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये ओआयएलएफ चा व्यापक पोहोच व रंगीतचा एसईईके अभ्यासक्रम यामुळे आपण आजच्या मुलांना सक्षम करत आहोत आणि त्याच वेळी उद्याचे परिवर्तनकर्ते तयार करत आहोत जे शाश्वत विकास ध्येये साध्य करतील व हवामान बदलाशी संवेदनशीलतेने व उद्देशपूर्ण कृतीने सामना करतील,” असे रुष्वा परिहार, प्रमुख, ओआयएलएफ यांनी सांगितले.
या कार्यक्रमात शिक्षकांसाठी १,२०० हून अधिक आकर्षक कृती, कथा, खेळ व कविता उपलब्ध आहेत. आतापर्यंत ११,००० पेक्षा जास्त विद्यार्थी व २०० शिक्षकांना याचा लाभ झाला असून २०२५ अखेरपर्यंत २०,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. पुण्यातील एमएसएस हायस्कूल (श्रीधरनगर, चिंचवड), आदर्श बालक मंदिर (आकुर्डी), लक्ष्मीबाई धाईंजे विद्यालय (थेरगाव), लक्ष्मीबाई बारणे विद्यालय (थेरगाव), साने गुरुजी आदर्श विद्या निकेतन (पिंपरी) व कै. विष्णूपंत ताम्हाणे विद्यालय (चिखली) अश्या अनेक शाळांतील मुले या उपक्रमाचा भाग आहेत.
शिक्षकांचे अनुभव:
“या अभ्यासक्रमामुळे मुलांचे संवादकौशल्य, सहकार्याची भावना, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि पर्यावरणाबद्दलची जागरूकता वाढली आहे. खेळातून शिकवण्यावर भर दिल्यामुळे शिकण्याची प्रक्रिया आनंददायी झाली आहे. विद्यार्थी मोठ्या उत्साहाने रंगीतच्या कृतींमध्ये भाग घेतात. अॅपमुळे विद्यार्थ्यांचे शिकण्याचे डेटा त्वरित गोळा करून विश्लेषण करणे शक्य झाले आहे, ज्यामुळे शिक्षकांना त्यांच्या प्रगतीचे अचूक मूल्यमापन करता येते.” – वैशाली येळे, शिक्षिका, एम.एस.एस. हायस्कूल, श्रीधरनगर, चिंचवड
“हा कार्यक्रम आमच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ, समाज मॉड्यूलमधील ‘अनुमोदन वर्तुळ’ या कृतीमुळे माझ्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले. ते अधिक नम्र आणि सभ्य झाले.” – श्रीमती उषा केसकर, शिक्षिका, अनुसया ओव्हाळ माध्यमिक शाळा, पुनावळे
“मुलांमध्ये आम्ही पाहिलेला सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे त्यांनी मुलगा-मुलगी भेदभावाची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दरीची जाणीव करून घेतली. आधी रोज बघूनही त्यांनी ते लक्षात घेतले नव्हते. पण आता ते समजल्यावर मुलांमध्ये या विषयावर चर्चा सुरू झाल्या आहेत.” – हेमलता कोकणे, मुख्याध्यापिका (माध्यमिक), नव महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर, रुपीनगर
विद्यार्थ्यांचा उत्साह:
“रंगीत प्रोग्राममुळे मला समाजात कसे वावरावे हे समजले. एकमेकांशी कसं वागावे, स्वतःच्या व इतरांच्या भावनांचा आदर कसा करावा हे कळाले. समाजात स्त्री आणि पुरुषांना समान हक्क मिळाला पाहिजे हे मला समजले. जितके महत्त्वपूर्ण, कार्यक्षम, ताकतवर आपण पुरुषांना समजतो तेवढाच स्त्रियांनाही समजले पाहिजे. हा प्रोग्राम आम्हाला खूप फायदेशीर ठरला याबद्दल धन्यवाद.” – स्वाती चेके (विद्यार्थी), पिंपरी चिंचवड, पुणे
“आम्ही गुंडगिरी निषिद्ध बद्दल माहिती शिकलो तसेच गुंडगिरीचे अनेक प्रकार सुद्धा आम्हाला कळाले, त्यामुळे आपल्यावर किंव्हा इतरांवर गुंडगिरी होत असेल तर काय करावे हे कळाले. आम्ही इंग्रजी मधले काही शब्द शिकलो व जेंव्हा शाळेत रंगीत ची टीम आली होती त्यांच्यासोबत इंग्रजी मध्ये बोललो.” – प्रतीक खरबाड (विद्यार्थी), चिंचवड, पुणे
पुण्यातील हा विस्तार ओआयएलएफ आणि रंगीत यांच्या सामायिक ध्येयाचे प्रतिक आहे – असे नागरिक घडवणे जे स्वतःचे निर्णय घेऊ शकतील आणि अनिश्चित भविष्याला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतील.


