Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedयुनेस्कोच्या जागतिक वारसा स्वयंसेवक कार्यक्रम २०२५ कास पठारावर संपन्न महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण...

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्वयंसेवक कार्यक्रम २०२५ कास पठारावर संपन्न महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या ‘आयएसडीएस’चा या उपक्रमात पुढाकार

पुणे, दि. 21 : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेने स्थापन केलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ
सस्टेनेबल डेव्हलपमेंट स्टडीज’ तर्फे (आयएसडीएस) युनोस्कोने आखलेल्या ‘जागतिक वारसा स्वयंसेवक कार्यक्रम २०२५’ (वर्ल्ड हेरिटेज साईट व्हॉलेंटीयर्स उर्फ डब्ल्यूएचव्ही २०२५) साठी सातारा जिल्ह्यातील कास पठारावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात देशभरातून कोलकता, लखनौ, हैदराबाद, नाशिक आणि मुंबई येथील विविध शैक्षणिक संस्थांमधून सांस्कृतिक पार्श्वभूमी असणाऱ्या तरुण तरुणी त्यामध्ये सहभागी झाले होते.

प्रशिक्षणातील तज्ज्ञ मार्गदर्शकांमध्ये आयएसडीएसच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ.अस्मिता जोशी, तसेच डॉ. सचिन पुणेकर, डॉ. भाग्यश्री पाटसकर, प्रा. निधी दीक्षित, प्रा. सौरभ साबळे आणि प्रा. मोनाली झेंडे यांचा समावेश होता.

आयएसडीएस तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘डब्ल्यूएचव्ही २०२५’ या प्रशिक्षण कार्यक्रमास महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देव तसेच डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज आर्किटेक्चर फॉर वूमेनचे (बीएनसीए) प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते व त्यांचे सहकारी यांची मदत झाली. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी बायोस्फीयर, एसएमएआरटी, बीएनसीए यांचे पाठबळ मिळाले.

जागतिक वारशासंबंधी काम करणाऱ्या युनेस्कोने या प्रशिक्षणासाठी भारतातून महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या आयएसडीएसची नेमणूक केली असल्याचे, डॉ.अस्मिता जोशी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, २००८ मध्ये युनेस्कोने सुरू केलेल्या या उपक्रमाचा उद्देश युवकांना त्यात प्रत्यक्ष सहभागी करून निसर्गाचे संवर्धन व त्यासंबंधीची जनजागृती निर्माण करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार हा प्रशिक्षणकार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाच्या उद्दीष्टानुसार जागतिक वारशाबद्दल जनजागृती करणे, त्यासंबंधी युवकांना संवर्धनाची कौशल्ये शिकवणे, तसेच त्यामध्ये स्थानिक लोकसमूह व संस्थांना सहभागी करून या उपक्रमाला बळकटी व व्यापकता देत प्रोत्साहन देणे हा आहे. आयएसडीएस तर्फे आयोजित करण्यात आलेला हा ‘डब्ल्यूएचव्ही २०२५’ प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे युवावर्गाला प्रेरणा देणारा निसर्ग संवर्धन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि ठोस अशा संस्थात्मक पाठबळाचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

डॉ. जोशी पुढे म्हणाल्या की, पश्चिम घाटातील फुलांनी बहरलेले कास पठार हा भाग २०१२ मध्ये युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट केला होता. हा प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे युवावर्गाला प्रेरणा देणारा निसर्ग संवर्धन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि ठोस अशा संस्थात्मक पाठबळाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात कास पठारावरील देवराई, कासाई देवी मंदिर, तेथील कास पठारावरील तलाव, घाटाई देऊळ व देवराई आणि येवतेश्वर याठिकाणी भेटी देऊन त्यांचे महत्त्व सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments