Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedनारदीय कीर्तन महोत्सव ‘बालभक्तांचा मेळा, रंगला कीर्तन सोहळा’

नारदीय कीर्तन महोत्सव ‘बालभक्तांचा मेळा, रंगला कीर्तन सोहळा’

३७ व्या पुणे फेस्टिव्हलअंतर्गत नारदीय कीर्तन महोत्सव ‘बालभक्तांचा मेळा, रंगला कीर्तन सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह, टिळक रोड, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती नारदीय कीर्तन महोत्सवाच्या सहसमन्वयक तन्मयी मेहेंदळे – कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अ‍ॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई व माजी नगरसेवक अविनाश बागवे उपस्थित होते.

 

 

 

या विशेष कार्यक्रमात भक्त प्रल्हाद, बाल ध्रुव, भगवान शंकर, नारदमुनी, बल्लाळ गणेश यांच्या कथांद्वारे पूर्वरंग मांडणी केली जाईल. महोत्सवाच्या अध्यक्षा कीर्तन रत्न व कीर्तन विशारद ह. भ. प. निर्मलाताई जगताप कार्यक्रमाचा उत्तररंग भक्तराज नांबी या कथेने सादर करतील.

 

 

 

पूर्वरंग मांडणी आणि नमन यामध्ये समन्वयक कीर्तन विशारद ह. भ. प. निवेदिता नचिकेत मेहेंदळे व सहसमन्वयक कीर्तन रागिणी ह. भ. प. तन्मयी मेहेंदळे – कुलकर्णी यांचा प्रमुख सहभाग राहणार असून, ह. भ. प प्रज्ञा वाळिंबे, ह. भ. प ऍड. धनदा गदगकर, ह. भ. प दया कुलकर्णी, ह. भ. प वैदेही जोशी व ह. भ. प अर्चना कुबेर या सुप्रसिद्ध महिला नारदीय कीर्तनकार या सोहळ्यात १२ कीर्तनकार आणि ओंकार जोशी, साहिल पुंडलिक, ईशान मेहेंदळे व तबला वादक व तालगुरू नचिकेत मेहेंदळे आणि अजून ८ संगतकार सहभागी होणार आहेत.

 

 

 

कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे सौ. गायत्री आशुतोष एरंडे यांचे कुंचल्यातून चित्ररूप बाल भक्तांचे कीर्तनमेळा हे विशेष सादरीकरण. तसेच टिळक रोड परिसरातील तीन शाळांचे विद्यार्थी प्रेक्षक म्हणून सहभागी होणार आहेत.

 

 

 

निवेदिता नचिकेत मेहेंदळे, समन्वयक नारदीय कीर्तन महोत्सव २०२५ – ९८५०८९१५१२

 

तन्मयी मेहेंदळे – कुलकर्णी, सहसमन्वयक नारदीय कीर्तन महोत्सव २०२५ – ९३७१२५१७९६

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments