Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedगणेशोत्सव काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहन वाहतूक बंद...

गणेशोत्सव काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहन वाहतूक बंद आदेश जारी

पुणे दि.25 :- शहरात गणेश उत्सव काळात नागरिकांची साहीत्य खरेदी व देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सुरक्षेची उपाययोजना व रस्त्यांवरून धावणा-या जड/अवजड वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होवून त्यांचे जिवीतास धोका होवू नये तसेच शहरातील खालील ठिकाणी वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे राहण्यासाठी पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा पुणे शहर, हिंमत जाधव यांनी अत्यावश्यक सेवेतील वाहने म्हणजेच फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, गणेश देखावे वाहतूक करणारी वाहने वगळून खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

 

25 ऑगस्ट ते 07 सप्टेंबर 2025 पर्यंत पुढील नमुद रस्त्यांवर जड / अवजड वाहनांच्या वाहतूकीस 24 तास बंदी करण्यात आली आहे. शास्त्री रोड – सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक, टिळक रोड – जेधे चौक ते अलका चौक, कुमठेकर रोड – शनिपार ते अलका चौक, लक्ष्मी रोड – संत कबीर चौक ते अलका चौक, केळकर रोड – फुटका बुरुज ते अलका चौक, बाजीराव रोड – पुरम चौक ते गाडगीळ पुतळा, शिवाजी रोड – गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, कर्वे रोड – नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड – खंडोजीबाबा चौक ते विर चाफेकर चौक, जंगली महाराज रोड – स.गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक, सिंहगड रोड – राजाराम ब्रिज ते सावरकर चौक, गणेश रोड / मुदलियार रोड – पॉवरहाऊस – दारुवाला – जिजामाता चौक – फुटका बुरुज चौक या प्रमाणे करण्यात आलेल्या वाहतुक बदलांचा अवलंब करून गणेशोत्सव शांततेने पार पाळण्यास व वाहतुक सुरळीत ठेवण्यास पुणे शहर वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा पुणे शहर, हिंमत जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments