पुणे, 25 ऑगस्ट २०२५ : आर्थिक साक्षरतेचे महत्त्व तसेच जबाबदारीने गुंतवणूक करण्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सीडीएसएल इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडा’तर्फे (सीडीएसएल आयपीएफ) पुण्यात गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आकुर्डी येथील डी. वाय. पाटील आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये भांडवली बाजाराच्या मूलभूत संकल्पना, डिपॉझिटरीजची भूमिका आणि सुरक्षित व सुजाण गुंतवणुकीचे निर्णय कसे घ्यावेत यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
ही सत्रे मराठी भाषेत घेण्यात आली. तज्ज्ञांनी सोप्या भाषेचा आणि प्रत्यक्ष उदाहरणांचा वापर करून महत्त्वाच्या आर्थिक संकल्पना स्पष्ट केल्या. त्यामुळे स्थानिक श्रोत्यांसाठी हा विषय अधिक सुलभ व रसपूर्ण झाला.
अशा उपक्रमांद्वारे देशाच्या विविध भागांत आर्थिक जागरूकता पसरवण्यास सीडीएसएल आयपीएफ कटिबद्ध आहे.


