पुणे, 17 फेब्रुवारी 2024: युवा उद्योजक आणि मा. नगरसेवक श्री सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमीत्त (२० फेब्रुवारी)सोमेश्वर फौंडेशनच्या वतीने आयोजित सुपर सनी विक”जिल्हा स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत जिया खैरनार, पूर्वा सातव, अनुष्का भारद्वाज, संजना यादव यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजयी सलामी दिली.
गोखले नगर येथील शहिद तुकाराम ओंबाळे मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रींग उभारलेल्या या मैदानात पहिल्या फेरीत 27 ते 30 किलो वजनी गटात
जिया खैरनारने दिव्या पाटीलचा 4-1 असा तर, पूर्वा सातवने प्रियांका राठोडचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला.
33 ते 46 वजनी गटात अनुष्का भारद्वाजने मुग्धा कुंभारचा 4-1 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. 44 ते 46 वजनी गटात संजना यादवने जान्हवी सांगळेचा 4-1 असा तर, झिनेत शेखने सृष्टी चोरगेचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन युवा उद्योजक आणि मा. नगरसेवक सनी निम्हण यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी माजी नगरसेवक निलेश निकम, आदित्य माळवे, प्रदीप देशमुख, प्रवीण डोंगरे, सचिन इंगळे, हेमंत डाबी, गणेश शिंदे, अभिजीत धाडवे, अभिजित मोहिते, अभिमान धोत्रे
रशीद शेख, अस्लम मिरजकर, विवेक कांबळे, ओम डोंगरे, उपस्थित होते. सोमेश्वर फाउंडेशनचे उमेश वाघ यांनी सर्वांचे स्वागत केले. समद शेख यांनी सूत्रसंचालन आणि प्रताप जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
निकाल: पहिली फेरी:मुली:
27 ते 30 वजनी गट:
जिया खैरनार वि.वि.दिव्या पाटील 4-1;
पूर्वा सातव वि.वि.प्रियांका राठोड 5-0;
33 ते 46 वजनी गट:
अनुष्का भारद्वाज वि.वि.मुग्धा कुंभार 4-1;
44 ते 46 वजनी गट:
संजना यादव वि.वि.जान्हवी सांगळे 4-1;
झिनेत शेख वि.वि.सृष्टी चोरगे 3-2;
40 ते 43 वजनी गट:
परी पारधे वि.वि.आरुषी खेत्रे 5-0;


