पुणे,2 सप्टेंबर 2025 : जीवनशैलीतील बदलांमुळे मधुमेहपूर्व स्थितीत (प्री-डायबेटिक) असलेल्या भारतीयांना नवी आशा निर्माण होऊ शकते. फ्रीडम फ्रॉम डायबेटिस ने केलेल्या अभ्यास नुकताच (13 ऑगस्ट 2025) रोजी जर्नल ऑफ डायबेटिस रिसर्च मध्ये प्रसिध्द झाला आहे.या अभ्यासामध्ये डॉ.प्रमोद त्रिपाठींसह डॉ.दिप्तीका तिवारी,डॉ.निधी कदम,डॉ.अनघा व्यवहारे,डॉ.बेबी शर्मा,डॉ.तेजस काथरीकोली,डॉ.मल्हार गानला व डॉ.बंशी साबू यांचा समावेश होता.
अभ्यासासाठी वापरण्यात आलेला माहितीसाठा (डाटा) हा भारतातील 89 शहरांमधून मार्च 2020 ते मे 2023 दरम्यान एक वर्षाचा ऑनलाईन इंटीग्रेटेड आयएलआय प्रोग्राममध्ये नोंदणी केलेल्या 427 मधुमेहपूर्व स्थितीत (प्री-डायबेटिक) असलेल्या व पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या रूग्णांकडून घेण्यात आला.या माहितीसाठ्यामध्ये एचबीए1सी 5.7 टक्के ते 6.4 टक्के असणाऱ्या व 18 ते 75 वयोगटातील इन्सुलिन किंवा हायपोग्लायसेमिक एजंटस (ओएचए – रक्तातील साखर कमी करणारी औषधे) वर नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता.या प्रोग्राममध्ये दिलेल्या सल्ल्यामध्ये वैयक्तिकृत प्लांट बेस्ड डाएट, व्यायाम, वैद्यकीय व्यवस्थापन आणि मानसिक आधार याचा समावेश होता.
या अभ्यासाच्या शेवटी 47.1 टक्के रूग्णांमध्ये लक्षणीयरित्या सुधारणा दिसून आल्या.त्यामध्ये वजनात घट,एचबीए1सी,बीएमआय,फास्टिंग ब्लड ग्लुकोज,फास्टिंग इन्सुलिन, इन्सुलिन रेझिस्टन्स, लिपिड प्रोफाईल व रक्तदाब यात सुधारणा दिसून आली.उल्लेखनीय म्हणजे 34 टक्के रूग्णांच्या वजनात 10 टक्क्यांपेक्षा जास्त वजन कमी झाले.पुरुषांपेक्षा महिलांनी वजन आणि बीएमआय मध्ये जास्त घट दर्शविली.
फ्रीडम फ्रॉम डायबेटिसचे संस्थापक डॉ.प्रमोद त्रिपाठी म्हणाले की, भारतात प्री-डायबेटिस किंवा मधुमेह पूर्व स्थिती ही वाढती चिंता असून त्याचे प्रमाण अंदाजे 15 टक्के आहे,परंतु ही स्थिती आपल्या जीवनशैलीत सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाचा कालावधी देखील देते. या पूर्वलक्षी अभ्यासाचे उद्दिष्ट एकात्मिक जीवनशैलीच्या प्रभावाचे मूल्यांकन करणे. जवळजवळ अर्ध्या रूग्णांमध्ये सुधारणा (प्री-डायबेटिक रेमिशन) दिसून आले. यावरूनच भारतीय लोकसंख्येमध्ये प्री डायबेटिसचे व्यवस्थापन करण्यासाठी वैयक्तिकृत व बहुविद्याशाखीय दृष्टीकोनाचे महत्त्व अधोरेखित होते.या अभ्यासामध्ये सहभागींच्या वजनामध्ये लक्षणीय घट दिसून आली, तसेच ग्लायसेमिक नियंत्रणात सुधारणा,लिपीड प्रोफाईलमध्ये सुधारणा दिसून आली. लिंग आणि बीएमआय यासारख्या घटकांचा विचार करून प्री-डायबेटिस व्यवस्थापनासाठी वैयक्तिकृत धोरणांची आवश्यकता आहे,हे यातून दिसून
येते.


