४२ एमडब्ल्यूपीचा हा प्रकल्प स्वराज ट्रॅक्टर्सच्या उत्पादन युनिट्स विजेच्या सुमारे ५० टक्के गरजा पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे.
प्रकल्पाची सुरुवात डीकार्बोनायझेशन, नवीकरणीय ऊर्जेचा स्वीकार आणि शाश्वत उत्पादनासाठीच्या स्वराजच्या दीर्घकालीन रोडमॅपमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
राष्ट्रीय, सप्टेंबर २, २०२६: महिंद्रा ग्रुपचा भाग असलेल्या स्वराज ट्रॅक्टर्स आणि ग्रुपचा नवीकरणीय ऊर्जा प्लॅटफॉर्म व इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर महिंद्रा सस्टेनने आज बठिंडा, पंजाब येथे ४२ एमडब्ल्यूपी ग्रुप कॅप्टिव्ह सौर प्रकल्प कार्यान्वित करण्याची घोषणा केली. हा प्रकल्प राज्यातील आपल्या प्रकारच्या सर्वात मोठ्या ग्रुप कॅप्टिव्ह सौर प्रकल्पांपैकी एक आहे.
हा प्रकल्प स्वराज ट्रॅक्टर्सच्या उत्पादन युनिट्सच्या विजेच्या गरजांपैकी सुमारे ५० टक्के गरजा पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे महिंद्रा ग्रुपच्या शाश्वततेच्या कटिबद्धतेनुसार भविष्यासाठी सज्ज, कमी-कार्बन उत्पादन परिसंस्था तयार करण्याच्या कंपनीच्या व्यापक धोरणात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
महिंद्रा सस्टेनद्वारे विकसित आणि कार्यान्वित केलेला ४२ एमडब्ल्यूपीचा हा सौर प्रकल्प मोहाली, पंजाब येथील स्वराज ट्रॅक्टर्सच्या मॅन्युफॅक्चरिंग, असेंब्ली आणि फाऊंड्री ऑपरेशन्सना नवीकरणीय वीज पुरवेल. सुमारे १४१ एकरवर पसरलेल्या या प्रकल्पात फिक्स्ड-टिल्ट स्ट्रक्चर्सवर बसवलेले उच्च-कार्यक्षमतेचे एन-टाइप टॉपकॉन बायफेशिअल सोलर मॉड्यूल्स समाविष्ट आहेत. प्रकल्पाची उर्वरित क्षमता पंजाबमध्ये असलेल्या महिंद्रा ग्रुपच्या इतर घटकांच्या वीज वापराला पर्यावरणस्नेही बनवण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे.
हा प्रकल्प कार्यान्वित होण्याबाबत मत व्यक्त करत महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या स्वराज डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गगनजोत सिंग म्हणाले, “जवळपास अर्ध्या शतकापूर्वी स्वराजची स्थापना स्वावलंबन आणि स्वातंत्र्याच्या तत्त्वांवर झाली होती. भारत ज्या वेळी जीवाश्म इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करत आहे आणि देशवासीयांसाठी अधिक हरित पर्यावरणाच्या दिशेने पावले टाकत आहे, अशा वेळी द्विसूत्री धोरणाद्वारे योगदान देण्याचा स्वराजला अभिमान वाटतो: ऊर्जा वापर कमी करणे आणि टप्प्याटप्प्याने पारंपारिक स्रोतांच्या जागी नवीकरणीय ऊर्जेचा वापर करणे.
या वर्षाच्या सुरुवातीला स्वराजला ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी गोल्डन पीकॉक अवॉर्ड फॉर एनर्जी एफिशिएन्सीने सन्मानित करण्यात आले होते. बठिंडा, पंजाब येथे अत्याधुनिक सौर प्रकल्प विकसित करणाऱ्या महिंद्रा सस्टेनसोबत सहयोगामुळे हे शक्य झाले आहे. आता आम्ही आमच्या निम्म्याहून अधिक ऊर्जेच्या गरजा नवीकरणीय स्रोतांमधून पूर्ण करून आमच्या ऊर्जा-कार्यक्षमता उपक्रमांना अधिक दृढता देत आहोत. हा प्रकल्प आमचे ऊर्जा स्वावलंबन अधिक दृढ करतो, महिंद्रा ग्रुपच्या प्लॅनेट पॉझिटिव्ह बनण्याच्या ध्येयात योगदान देतो आणि ‘टूगेदर वी राईज फॉर अ मोअर इक्वल, मोअर सस्टेनेबल वर्ल्ड’ हे आमचे व्हिजन पुढे नेतो.”
स्वराजचा शाश्वततेचा प्रवास केवळ नवीकरणीय ऊर्जेच्या स्वीकारापुरता मर्यादित नाही. २०२३ मध्ये, सर्व स्वराज ट्रॅक्टर उत्पादन प्लांट्सनी ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण्यासाठी EP100 प्रमाणपत्र प्राप्त केले, जे महिंद्रा ग्रुपच्या कटिबद्धतेच्या वेळेपेक्षा सात वर्षे आधीच पूर्ण झाले आहे.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत महिंद्रा सस्टेनचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. अविनाश राव म्हणाले, “स्वराज ट्रॅक्टर्सच्या नवीकरणीय ऊर्जा परिवर्तन आणि शाश्वतता अजेंड्याला पुढे नेण्यासाठी त्यांच्यासोबत सहयोग करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. या प्रकल्पाची सुरुवात महिंद्रा सस्टेनच्या ग्रुप कॅप्टिव्ह रचनेद्वारे व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांना वीज पुरवठ्यातील पहिल्याच पावलाचे प्रतिनिधित्व करते, जे सरकारी युटिलिटीजला वीज पुरवण्याच्या आमच्या पारंपारिक मॉडेलला पूरक ठरते.
प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या वेळी पंजाबमधील सर्वात मोठ्या ग्रुप कॅप्टिव्ह सौर प्रकल्पांपैकी एक असलेला हा प्रकल्प दरवर्षी ४२,००० टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाचा प्रभाव कमी करेल, अशी अपेक्षा आहे.”
महिंद्रा सस्टेन हा महिंद्रा ग्रुपचा नवीकरणीय ऊर्जा प्लॅटफॉर्म आणि एक अग्रगण्य इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर आहे. कार्यरत आणि निर्माणाधीन नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या भक्कम पोर्टफोलिओसह, महिंद्रा सस्टेन भारताच्या स्वच्छ ऊर्जा परिवर्तनाला गती देण्यास मदत करत आहे.
कंपनीच्या क्षमता केवळ सौर ऊर्जेपुरत्या मर्यादित नसून हायब्रिड रिन्युएबल एनर्जी सोल्यूशन्स आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्सपर्यंत पसरलेल्या आहेत; ज्यामुळे विश्वासार्ह, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज नवीकरणीय ऊर्जा एकत्रीकरण शक्य होते. महिंद्रा सस्टेन हे एनएसईवर सूचीबद्ध असलेल्या आणि नवीकरणीय ऊर्जेवर केंद्रित असलेल्या सस्टेनेबल एनर्जी इन्फ्रा ट्रस्ट या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे सह-प्रायोजक देखील आहे.
कामगिरी, लोक आणि प्लॅनेट (पृथ्वी) एकत्र प्रगती करतील याची खात्री करताना स्वराज महिंद्रा ग्रुपच्या फार्म इक्विपमेंट व्यवसायाच्या या दशकात महसुलात तीन पट वाढ मिळवण्याच्या ध्येयात मोठे योगदान देते.
अलीकडच्या वर्षांतील आपल्या प्रबळ वाढीसोबत स्वराजने मनुष्यबळ विकास, विविधता व सर्वसमावेशकता, आणि समुदाय सक्षमीकरणामध्ये सतत गुंतवणूक केली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये, ग्रामीण समुदाय प्रबळ करण्यासाठी आणि भारतातील खेड्यापाड्यांमध्ये सर्वसमावेशक वाढ सक्षम करण्यासाठीच्या सततच्या कटिबद्धतेसाठी स्वराजला गोल्डन पीकॉक अवॉर्ड फॉर सीएसआर एक्सलन्स प्रदान करण्यात आला.
सर्व स्वराज मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स वॉटर पॉझिटिव्ह आहेत आणि झिरो वेस्ट टू लँडफिल सुविधा म्हणून प्रमाणित आहेत. स्वराजची फाऊंड्री ही झिरो वेस्ट टू लँडफिल प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली फाऊंड्री ठरली. भविष्याचा विचार करता, कंपनी उत्पादनाशी संबंधित स्कोप ३ उत्सर्जन कमी करणे, पुरवठादार डीकार्बोनायझेशनला गती देणे, ईएसजी क्षमता निर्माण करणे, ग्रीन डीलरशिप प्रोग्रामचा विस्तार करणे आणि आपल्या ऑपरेशन्समध्ये विविधता दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
महिंद्रा ग्रुपला शाश्वतता नेतृत्वासाठी अनेक सन्मान मिळाले आहेत आणि धोरण, रिपोर्टिंग, डिस्क्लोजर्स आणि अंमलबजावणीमध्ये हवामान कृती व ईएसजी तत्त्वे समाविष्ट करण्यात भारतातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखले जाते. जबाबदार वाढीसाठीच्या आपल्या कटिबद्धतेद्वारे ग्रुपने आपल्या भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे सुरू ठेवले आहे.
प्रकल्पाचे प्रमुख मुद्दे
गाव तेओना पुजारियन, तळवंडी साबो, बठिंडा येथे स्थित, ही सौर सुविधा सुमारे १४१ एकरवर विकसित करण्यात आली आहे.
या प्रकल्पात फिक्स्ड-टिल्ट स्ट्रक्चर्सवर बसवलेले उच्च-कार्यक्षमतेचे एन-टाइप टॉपकॉन बायफेशिअल सोलर मॉड्यूल्स समाविष्ट आहेत. उपलब्ध जमिनीचा इष्टतम वापर करून उच्च ऊर्जा उत्पादन देण्यासाठी ही तंत्रज्ञान यंत्रणा निवडण्यात आली आहे.
ही सुविधा दरवर्षी सुमारे ६१.५४ दशलक्ष युनिट्स नवीकरणीय वीज निर्माण करेल आणि दरवर्षी ४२,००० टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाचा प्रभाव कमी करेल, अशी अपेक्षा आहे.
हा प्रकल्प ९७ टक्क्यांपेक्षा जास्त घटक भारतातून प्राप्त करून देशांतर्गत स्रोतांचा वापर करण्याच्या दृढ कटिबद्धतेला दर्शवतो. हे देशाच्या नवीकरणीय ऊर्जा उत्पादन परिसंस्थेला आणि आत्मनिर्भर वाढीच्या व्यापक दृष्टिकोनाला पाठबळ देते.
सोलर मॉड्यूल्स स्वच्छ करण्यासाठी सेमी-ऑटोमेटेड रोबोटिक सिस्टम्सचा वापर केला जाईल, ज्यामुळे प्रकल्पाला दरवर्षी अंदाजे १.९२ दशलक्ष लिटर पाण्याची बचत करण्यास मदत होईल.
प्रकल्पाच्या विकासादरम्यान पर्यावरण व सामाजिक प्रभाव मूल्यांकन, तसेच हवामान बदल मूल्यांकन करण्यात आले. कचरा व्यवस्थापन, वाहनांच्या हालचालींचे नियंत्रण आणि सभोवतालच्या परिसंस्थेला होणारा त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना देखील लागू
करण्यात आल्या आहेत.
***


