Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपर्यावरणपूरक बांधकामात चुन्याचा पुनर्वापर यावर पुरंदरे वाड्यात कार्यशाळा ...

पर्यावरणपूरक बांधकामात चुन्याचा पुनर्वापर यावर पुरंदरे वाड्यात कार्यशाळा बीएनसीए, इंटॅक, नयनतारा फौंडेशन आणि सरदार पुरंदरे कुटूंबीयांतर्फे आयोजन

पुणे, दि. १९ : पर्यावरणपूरक बांधकाम साहित्यामध्ये चुन्याचा वापर लक्षात घेता ‘चुन्याच्या बांधकामातील पुनर्वापर’ यावरील वैशिष्ट्यपूर्ण कार्यशाळा नुकतीच सासवडच्या प्रसिद्ध पुरंदरे वाड्यात पार पडली. महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील संस्कृती अध्ययन केंद्र, ‘इंटॅक’ (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अॅण्ड कल्चर) संस्थेचा पुणे व कोल्हापूर विभाग, तसेच नयनतारा फौंडेशन आणि सासवड येथील सरदार श्रीमंत पुरंदरे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दिल्ली, मुंबई आणि बीएनसीएसह पुण्यातील काही महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांच्या प्रोत्साहनातून झालेल्या या कार्यशाळेच्या आयोजनात बीएनसीएतील संस्कृती अध्ययन केंद्राच्या प्रमूख डॉ. वैशाली लाटकर, कोल्हापूर ‘इंटॅक’च्या प्रमूख अमरजा निंबाळकर आणि ‘इंटॅक’च्या सुप्रिया महाबळेश्वरकर व जुई तावडे तसेच नयनतारा फौंडेशनचे आर्किटेक्ट शिवराज दांगट सहभागी झाले होते. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना सोनल करंजीकर, निनाद जोग आणि स्वप्नील दोशी या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी पुरंदरे कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते.

चुन्यासारख्या पारंपरिक साहित्याच्या पुनर्वापरासंदर्भात ही कार्यशाळा ऐतिहासिक पुरंदरे वाड्यात आयोजित करताना पुरंदरे वाड्याच्या जतन-संवर्धनास मदत करत असल्याची कृतज्ञतेची भावना डॉ. वैशाली लाटकर यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, नजीकच्या भविष्यात अशा प्रकारच्या आणखी कार्यशाळा आयोजित करणार आहोत. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या कोणत्याही वास्तूंची डागडुजी करताना चुन्याचा वापर केला पाहिजे यासंबंधीची जागृती करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments