गुरूग्राम, भारत – फेब्रुवारी 19, २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डने आज गॅलॅक्सी ए३४ ५जी स्मार्टफोनवर आकर्षक कॅशबॅक ऑफरची घोषणा केली. गॅलॅक्सी ए३४ ५जी सॅमसंगची सिग्नेचर गॅलॅक्सी डिझाइन आणि प्रमुख वैशिष्ट्ये जसे नाइटोग्राफी, जे ग्राहकांना अंधुक प्रकाशात देखील सुस्पष्टपणे फोटोज व व्हिडिओज कॅप्चर करण्यास मदत करते, यासह प्रिमिअम अनुभव देतो. दर्जात्मक आयपी६७ रेटिंग, गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन, ४ अँड्रॉईड ओएस अपग्रेड्स आणि ५ सिक्युरिटी अपडेट्ससह गॅलॅक्सी ए३४ ५जी वापरकर्त्यांना चिंतामुक्त स्मार्टफोन वापराचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
स्पेशल ऑफर म्हणून ग्राहक ३००० रूपयांच्या त्वरित सूटसह गॅलॅक्सी ए३४ ५जी खरेदी करू शकतात. ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएण्टसाठी मूळ किंमत २७४९९ रूपयांपासून सुरू होते, पण ग्राहक आता गॅलॅक्सी ए३४ ५जी फक्त २४४९९ रूपयांमध्ये आणि ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएण्ट फक्त २६४९९ रूपयांमध्ये खरेदी करू शकतात.
गॅलॅक्सी ए३४ ५जी मध्ये फ्लोटिंग कॅमेरा सेटअप, तसेच मेटल कॅमेरा डेको आहे, जे डिवाईसच्या रंगाशी जुळून जाते. हा स्मार्टफोन व्हायोलेट, लाइम, सिल्व्हर व ग्रॅफाईट या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. दीर्घकाळापर्यंत कार्यरत राहण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला गॅलॅक्सी ए३४ ५जी आयपी६७ रेटिंगसह स्पिल व स्प्लॅश रेसिस्टण्स आहे, याचा अर्थ असा की हा स्मार्टफोन जवळपास ३० मिनिटांपर्यंत १ मीटर फ्रेश वॉटरमध्ये कार्यरत राहू शकतो. तसेच, या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन आहे, जे ओरखडे व नकळतपणे खाली पडल्यामुळे होणा-या नुकसानापासून सुरक्षिततेची खात्री देते. गॅलॅक्सी ए३४ ५जी वरील वैविध्यपूर्ण डिस्प्लेमध्ये ट्रू-टू-लाइफ रंगांसह सुपर एएमओएलईडी तंत्रज्ञान आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे, जे गतीशील चित्रांमध्ये देखील सुलभ सीन-टू-सीन ट्रान्झिशन्सची खात्री देते.
गॅलॅक्सी ए३४ ५जी मध्ये ४८ मेगापिक्सल ओआयएस प्रायमरी लेन्स, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि ५ मेगापिक्सल माक्रो लेन्स आहे. तसेच गॅलॅक्सी ए३४ ५जी मध्ये विविध कॅमेरा एआय वैशिष्ट्ये देखील आहेत, जसे ऑब्जेक्ट इरेजर, इमेज रिमास्टर आणि इमेज क्लिपर. ऑब्जेक्ट इरेजर नको असलेले ऑब्जेक्ट्स, शॅडोज आणि फोटोंमधील प्रतिबंध दूर करते. इमेज रिमास्टर नवीन इमेज प्रोसेसिंग इंजिनसह फोटोंना अधिक आकर्षक करते आणि इमेज क्लिपर ग्राहकांना त्यांच्या फोटोंमधील सबजेक्ट्स कट करून दुस-या ठिकाणी वापरण्याची सुविधा देते.
गॅलॅक्सी ए३४ ५जी मध्ये सॅमसंगचे डिफेन्स-ग्रेड सिक्युरिटी प्लॅटफॉर्म नॉक्स आहे, जे रिअल-टाइममध्ये वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करते. तसेच, गॅलॅक्सी ए३४ ५जी ग्राहकांना अनेक अर्थपूर्ण प्रायोगिक वैशिष्ट्ये देतो, जे त्यांचे जीवन संपन्न करतात. अद्वितीय वॉईस फोकस वैशिष्ट्य वापरकर्त्यांना लोकप्रिय थर्ड पार्टी अॅप्समध्ये देखील सुस्पष्टपणे वॉईस/व्हिडिआ कॉल्सचा आनंद घेण्यास साह्य करते. गॅलॅक्सी ए३४ ५जी मध्ये सॅमसंग वॉलेट आहे, जे ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट कार्ड्ससह टॅप अॅण्ड पे वैशिष्ट्य आणि सुलभ यूपीआय पेमेंट्स अनुभव देते. वापरकर्ते सॅमसंग वॉलेटसह सुरक्षितपणे पॅन, ड्रायव्हिंग लायसेन्स, व्हॅक्सिन सर्टिफिकेट्स असे त्यांचे डिजिटल आयडी प्राप्त करू शकतात.


