Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिकॉन इंडिया व डब्ल्यूडब्ल्यूएफ - इंडियाच्या सहकार्याने 'वंडर्स ऑफ द वाइल्ड'...

निकॉन इंडिया व डब्ल्यूडब्ल्यूएफ – इंडियाच्या सहकार्याने ‘वंडर्स ऑफ द वाइल्ड’ स्पर्धेचे आयोजन

पुणे, २० फेब्रुवारी २०२४ : निकॉन इंडिया प्रा.लि.व वर्ल्डवाईड फंड फॉर नेचर-इंडिया (डब्ल्यूडब्ल्यूएफ – इंडिया) यांच्या सहकार्याने वंडर्स ऑफ द वाइल्ड’ या फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी स्पर्धेच्या पहिल्या सत्राची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्दिष्ट झाडे आणि प्राण्यांचे काही चित्तथरारक क्षण लेन्सद्वारे टिपण्यात उत्सुक असलेल्या भारतातील वन्यजीव छायाचित्रकार आणि व्हिडीओग्राफर यांची कुशलता ओळखणे आणि त्यांना बक्षीस देणे हे आहे. दीड महिना चालणारी ही स्पर्धा भारतभरातील वन्यजीव छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफरसाठी 03 मार्च 2024 पर्यंत खुली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहभागींना वयाची मर्यादा नाही. विजेत्यांना 8 लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार असून त्यांना वन्यजीव समुदायामध्ये देशभरात ओळख आणि प्रसिद्धी मिळवण्याची संधी देखील आहे. विजेत्याला 3,43,995 रुपये किमतीचा निकॉन झेड८ हा मिररलेस कॅमेरा बक्षीस म्हणून मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments