Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतातील पहिल्या ग्रीन मिथेनॉल बंकरिंग आणि रिफ्युअलिंग केंद्राच्या भुमिपूजनाची सुरुवात

भारतातील पहिल्या ग्रीन मिथेनॉल बंकरिंग आणि रिफ्युअलिंग केंद्राच्या भुमिपूजनाची सुरुवात

 

 

पुणे, १० सप्टेंबर २०२५- पुण्यातील सोपान ग्रूप तर्फे व्हीओसी पोर्ट ॲथॉरिटी (व्हीओसीपीए) च्या सहकार्याने भारतातील पहिल्या ग्रीन मिथेनॉल बंकरिंग आणि रिफ्युअलिंग केंद्राचे भुमिपूजन केले आहे. यामुळे देशात प्रथमच शाश्वत मॅरिटाईम सुविधांच्या निर्मिती मध्ये आणखी एक प्रगतीशील पाऊल टाकले आहे.

 

या महत्त्वपूर्ण सुविधेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री सर्बानंदा सोनोवाल यांच्या हस्ते बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालायाच्या अंतर्गत करण्यात आले असून यामुळे भारतातील बंदरांचे डी कार्बनायझेशन करण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे, या केंद्रामुळे आता देशाने स्वच्छ उर्जेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

 

🚢 प्रकल्पाची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये :

 

• ईपीसी कंत्राटदार म्हणून मे सोपान संपूर्ण प्रकल्प पूर्ण करतील.

• ७५० घनमीटर ग्रीन मिथेनॉल साठवण्यासह बंकरिंग टर्मिनलचा विकास

• संपूर्ण साठवणूकीची क्षमता आणि संपूर्ण केंद्राची निर्मिती

• प्रकल्प प्रायोगिक तत्वावर पूर्ण केला जाईल.

• सर्वसमावेशक ईपीसी मॉडेलच्या माध्यमातून प्रकल्पाची निर्मिती

 

हे ग्रीन मिथेनॉल केंद्र हे भारताच्या नेट झिरो एमिशन्स च्या वचनबध्दतेसह मॅरिटाईम इंडिया २०३० च्या उद्दिष्ट्यांशी सुसंगत असून यांतून भारताच्या स्वच्छ इंधन आणि बंदरांचा शाश्वत विकास करण्यास चालना मिळेल.

 

माननीय बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते पूर्वाश्रमीच्या तुतिकोरीन पोर्ट ट्रस्ट असलेल्या व्ही ओ चिदंबरनार पोर्ट ॲथोरिटी च्या ग्रीन मिथेनॉल वर आधारीत डिकार्बनायझेशनच्या प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या प्रकल्पाचे ५ सप्टेंबर २०२५ रोजी भुमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पा अंतर्गत ७५० घन मीटर ग्रीन मिथेनॉलचे बंकरिंग आणि शिप रिफ्युअलिंग टर्मिनलची बांधणी करण्यात येणार आहे.

 

व्हीओसीपीए चे अध्यक्ष श्री सुसांता पुरोहित यांनी सांगितले “ भारत सरकारने २०७० पर्यंत नेट झिरोचे लक्ष्य ठेवले आहे. या दृष्टिकोनाच्या माध्यमातून व्हीओसी पोर्ट ने ग्रीन पोर्ट मिशनच्या दिशेने एक उत्तम पाऊल टाकले आहे आणि यशस्वीपणे ग्रीन हायड्रोजन प्रकल्प पूर्ण केला आहे. शाश्वत विकास करण्याच्या आणि जागतिक स्तरानुसार काम करण्याच्या योजने अंतर्गत व्हीओसीपीए तर्फे भारतातील पहिल्या ग्रीन मिथेनॉल बंकरिंग आणि रिफ्युअलिंग केंद्राची स्थापना केली आहे. व्हीओसीपीए ला भारतातील सोपान ग्रुप या ग्रीन एनर्जी इकोसिस्टम आणि ईपीसी प्रकल्पातील अनुभवी तज्ञांबरोबर सहकार्य करतांना आंम्हाला आनंद होत आहे.

 

सोपान चे संचालक श्री अनिरुध्द कडवेकर यांनी सांगितले “ आजघडीला सोपान केवळ केंद्रांची निर्मिती करत नाही तर आम्ही भारताच्या ग्रीन जहाज बांधणीच्या भविष्याचा पाया घालत आहे. देशातील पहिल्या विशेष अशा ग्रीन मिथेनॉल बंकरिंग हब ची निर्मिती तुतिकोरिन येथे करुन आम्ही ९५ टक्क्यांपर्यंत सीओ२ चे बोटींकडून होणारे उत्सर्जन कमी करुन भारताला पर्यायी इंधन क्षेत्रातील महत्वपूर्ण खेळाडू बनण्यास सहकार्य करत आहोत. या प्रकल्पांच्या शृंखले मुळे भारताच्या मेक इन इंडिया क्षमतांचे द्योतक असून नेट झिरोच्या दिशेने पावले टाकण्यात आली आहेत, ज्यायोगे भारतातील बंदरे ही शाश्वत शिपिंग साठी प्राधान्यक्रमाची बंदरे ठरतील. व्हीओसी पोर्ट ॲथॉरिटी तर्फे आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आले आहे आणि बंदर, जहाजबांधणी तसेच जलमार्ग मंत्रालायाने आमच्यावर विश्वास दाखवल्या बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments