नवी दिल्ली, २० फेब्रुवारी २०२४: सर्विसनाऊ या अग्रगण्य डिजिटल वर्कफ्लो कंपनीने आज शिक्षण मंत्रालयांतर्गत ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य कराराचा उद्देश पहिल्या वर्षात १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना सर्विसनाऊ प्लॅटफॉर्मवर प्रशिक्षण देण्याचा आहे. हा सामंजस्य करार धोरणात्मक भागीदारीच्या दिशेने पहिले पाऊल आहे, ज्या अंतर्गत २५,००० विद्यार्थ्यांना तीन वर्षांत प्रशिक्षित केले जाईल.
हा सहयोग विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सुसज्ज कौशल्ये आणि क्षमता प्रदान करण्यासह जागतिक आणि केंद्रीकृत शिक्षण देतो. या एमओयूमुळे नाऊ लर्निंग प्लॅटफॉर्मवर सर्विसनाऊ ॲडमिनिस्ट्रेटर आणि डेव्हलपर कोर्सेसमध्ये प्रवेशासह सतत शिकण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच, विद्यार्थ्यांना उदयोन्मुख एआय तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाईल, जी सर्व संभाव्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक माहिती आहे. डिजिटल करिअरच्या दिशेने वाटचाल करण्यात मदत करणाऱ्या क्षेत्रातील विशिष्ट कौशल्यांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या एआयसीटीईच्या दृष्टीकोनाशी हे सुसंगत आहे.
सर्विसनाऊ आणि पीअरसनच्या नवीन संशोधनाच्या मते, भारतातील १६.२ दशलक्ष (जवळपास १.६ कोटी) कर्मचाऱ्यांनी ऑर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनमध्ये रिस्किल व अपस्किल होण्याची गरज असेल. याशिवाय, तंत्रज्ञान क्षेत्रात ४.७ दशलक्ष नवीन नोकऱ्याही निर्माण होणार आहेत. त्यामुळे, डिजिटल युगात व्यावसायिक वाढ आणि प्रगतीसाठी सर्व उद्योगांमध्ये डिजिटल अपस्किलिंग आणि रिस्किलिंग महत्त्वपूर्ण आहे.
सर्विसनाऊ येथील चीफ स्ट्रॅटेजी अॅण्ड कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर निक झिझॉन नवी दिल्लीमध्ये एआयसीटीई नेतृत्वासोबत भेट घेतल्यानंत म्हणाले, ”सर्विसनाऊला आजच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत भरभराट होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांसह अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सुसज्ज करण्याकरिता एआयसीटीईसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. सर्विसनाऊमध्ये आमचा विश्वास आहे की, डिजिटल परिवर्तनासाठी टॅलेंटमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे आणि सर्विसनाऊचा राइजअप प्रोग्राम तरूण अभियंत्यांना रोजगारासाठी तयार क्षमतेसह सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. हा सामंजस्य करार भारतभरातील एआयसीटीई संलग्न संस्थांना पात्र टॅलेंटचा समूह तयार करण्यास सक्षम करेल, जे भारतातील भावी तंत्रज्ञान नाविन्यतेला चालना देतील.”
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) चे अध्यक्ष प्रो. (डॉ.) टी जी सिताराम म्हणाले, ”विद्यार्थ्यांना सतत विकसित होत असलेल्या जगासाठी तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण त्यांना आधुनिक कौशल्ये आणि व्यावसायिक वाढीच्या संधी अधिकाधिक उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्विसनाऊसोबतच्या आमच्या सहयोगाचा विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संकल्पना आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगत प्रशिक्षण देण्याचा मनसुबा आहे. आम्ही त्यांना त्यांच्या गरजेनुसार आधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी प्रेरित करतो. या सहयोगामधून विद्यार्थ्यांच्या उच्च कौशल्य आणि तंत्रज्ञान साक्षरतेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) चे चीफ कोऑर्डिनेटिंग ऑफिसर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर बुद्ध म्हणाले, ”विद्यार्थ्यांना आव्हानांनी भरलेल्या जगासाठी तयार करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आधुनिक कौशल्ये आणि व्यावसायिक विकास आवश्यक आहे. सर्विसनाऊसोबत सहयोग करत विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण विचार आणि तंत्रज्ञानातील नवीन क्षमतांनी सुसज्ज करण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यास प्रेरित करतो. या सहयोगामधून विद्यार्थ्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी आणि त्यांना तंत्रज्ञान जाणकार बनवण्यासाठी आमची समर्पितता दिसून येते. भविष्यात त्यांच्या यशासाठी हे आवश्यक आहे.”
सर्विसनाऊचा राइजअप प्रोग्राम जगभरातील एक दशलक्ष व्यक्तींना मागणीदायी डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला जागतिक उपक्रम आहे. भारतात, सर्विसनाऊने युनिव्हर्सिटी अकॅडेमिक प्रोग्राम लाँच केला आहे आणि सरकारी भागीदारी, फ्यूचरस्किल्स प्राइम नॅसकॉम व आयसीटी अकॅडमी ऑफ तामिळनाडूसह १६ राज्यांमधील २० युनिव्हर्सिटीजसोबत सहयोग केला आहे, तसेच हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराकरिता सुसज्ज टॅलेंट विकसित करण्यासाठी प्रशिक्षित केले आहे.
भारत सर्विसनाऊच्या जागतिक स्तरावरील विकासाला गती देत आहे, तसेच भारतातील टॉप १० तंत्रज्ञान प्रदाते आणि टॉप पाच बँका सर्विसनाऊ उत्पादनांचा वापर करत आहेत.
भारतातील व्यवसाय व कंपन्यांना मदत करणाऱ्या अशा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मागणी वाढत आहे, ज्यांना सर्विसनाऊची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया माहित आहे, ज्यामुळे भारतीय व्यवसाय व कंपन्या डिजिटल विकासाचे नेतृत्व करू शकतील.


