पुणे, दि. 16:- (जिमाका वृत्तसेवा): भारतीय नागरीक सुरक्षा संहिता- 2023 चे कलम 163 नुसार आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात अवलिया दर्गा चावडी चौक ठिकाणी 200 चौरस मीटर परिसरात 18 सप्टेंबर 2025 पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश पारित केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 223 मधील तरतूदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहिल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
00000


