Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशनकडून महाराष्‍ट्रातील सीएसआर उपक्रमांसाठी 56 कोटी रूपयांची गुंतवणूक

ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशनकडून महाराष्‍ट्रातील सीएसआर उपक्रमांसाठी 56 कोटी रूपयांची गुंतवणूक

प्रकल्‍पांमध्‍ये 1 दशलक्ष झाडे असलेले आयओएनआयक्‍यू फॉरेस्‍ट (IONIQ Forest), वाहतूक अभियांत्रिकी व संस्‍थात्‍मक विकास केंद्रे आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्‍यासाठी सामाजिक कल्‍याण उपक्रमांचा समावेश आहे.

 

· राज्‍यामध्‍ये पर्यावरणीय शाश्वतता, रस्‍ता सुरक्षा आणि समुदाय विकास मजबूत करण्‍यासाठी उपक्रम सुरू करण्‍यात आले.

 

· महाराष्‍ट्र शासनासोबतचा सहयोग ह्युंडाईचा दृष्टिकोन ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’ला अधिक दृढ करतो.

 

 

 

मुंबई । सप्‍टेंबर 15, 2025: ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)च्‍या सीएसआर शाखेने आज महाराष्‍ट्रात 56 कोटी रूपयांच्‍या सीएसआर उपक्रमांची घोषणा केली, ज्‍यासह सर्वसमावेशकता आणि शाश्वत विकासाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. महाराष्‍ट्राचे माननीय मुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते सुरू करण्‍यात आलेले हे उपक्रम पर्यावरण, आरोग्‍यसेवा, रस्‍ता सुरक्षा आणि समुदाय कल्‍याणावर लक्ष केंद्रित करतात, ज्‍यामुळे हा ह्युंदाईचा राज्‍यासोबतच्‍या सहयोगामधील महत्त्वाचा टप्‍पा आहे.

 

 

 

या उपक्रमांबाबत मत व्‍यक्‍त करत महाराष्‍ट्राचे माननीय मुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, ”आज एचएमआयएफने आज सुरू केलेले उपक्रम महाराष्ट्रातील लोकांप्रती असलेली दृढ वचनबद्धता दर्शवतात. यामधून उत्‍पादक म्‍हणून, तसेच सामाजिक प्रगतीप्रती समर्पित जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्‍हणून देखील ह्युंडाईची भूमिका निदर्शनास येते.”

 

 

 

याप्रसंगी आपले मत व्‍यक्‍त करत एचएमआयएलचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अन्सू किम म्‍हणाले, ”आमचा जागतिक दृष्टिकोन ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’द्वारे मार्गदर्शित आम्‍ही समाजामध्‍ये अर्थपूर्ण बदल घडवून आणण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, जेथे सकारात्‍मक परिवर्तनाला चालना देत आहोत आणि समुदायांना अधिक मजबूत व अधिक शाश्वत होण्‍यास सक्षम करत आहोत. महाराष्‍ट्राचे आमच्‍यासाठी अत्‍यंत विशेष महत्त्व आहे, आमचा व्‍यवसायापलीकडे जात आणि व्‍यक्‍तींच्‍या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या उपक्रमांमध्‍ये गुंतवणूक करत समान मूल्‍य निर्माण करण्‍यावर नेहमी विश्वास आहे.”

 

 

 

प्रमुख प्रकल्‍प आयओएनआयक्‍यू फॉरेस्‍ट (IONIQ Forest) पुण्‍यातील डांगे चौक येथे राबवण्‍यात येईल आणि क्षेत्राला राज्‍यातील सर्वात मोठ्या वनीकरण क्षेत्रांमध्‍ये बदलेल. 32 कोटी रूपयांच्‍या गुंतवणूकीसह या उपक्रमामध्‍ये मियावाकी तंत्राचा वापर करत 90.5 एकर जागेवर एक दशलक्षहून अधिक स्‍थानिक झाडे लावली जातील, ज्‍यासह ह्युंडाईचे देशभरातील हरित प्रयत्‍न अधिक दृढ होतील. रस्‍ता सुरक्षा वाढवण्‍यासाठी ईजी रोड्स उपक्रमांतर्गत एचएमआयएफने नागपूर व पुण्‍यामध्‍ये वाहतूक अभियात्रिकी केंद्र आणि संस्‍था विकास केंद्र स्‍थापित करण्‍यासाठी 4 कोटी रूपयांचा उपक्रम सुरू केला, ज्‍यामुळे नागपूर वाहतूक पोलिसांच्‍या ‘माय रोड, माय फ्रेण्‍ड’ मोहिमेला पाठिंबा मिळाला आहे.

 

 

 

नाशिक व तळेगावमध्‍ये घोषणा करण्‍यात आलेला अधिकार कनेक्‍ट उपक्रम कागदपत्रव्‍यवहार व अर्ज प्रक्रियेमध्‍ये साह्य करत, ग्रामीण समुदायांमध्‍ये डिजिटल व आर्थिक साक्षरतेला चालना देत सार्वजनिक कल्‍याणामधील तफावत दूर करेल. तसेच, एचएमआयएफचे भारतभरात सुरू असलेले उपक्रम महाराष्‍ट्रातील समुदाय विकास प्रयत्‍नांना अधिक मजबूत करतील, जसे स्‍पर्श संजीवनी टेलिमेडिसीन क्लिनिक्‍स व मोबाइल मेडिकल युनिट्सच्‍या माध्‍यमातून आरोग्‍यसेवा अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देणे, होप फॉर कॅन्‍सर अंतर्गत कर्करोगाबाबत जागरूकता व उपचारासाठी साह्य, स्‍पोर्ट्स लॅब अंतर्गत तळागाळापासून क्रीडा प्रतिभांना निपुण करण्‍यासाठी सेंटर ऑफ एक्‍सलन्‍स, आर्ट फॉर होप अंतर्गत कला व संस्‍कृतीच्‍या प्रचारासाठी आर्थिक अनुदान आणि ड्राइव्‍ह4प्रोग्रेस अंतर्गत ड्रायव्‍हर प्रशिक्षण व ऑटोमोटिवह प्रशिक्षण.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments