गुरगाव, २० फेब्रुवारी २०२४ – बजाज अलियान्झ लाइफ या भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक कंपनी आणि सॅटिन क्रेडिटकेयर नेटवर्क लिमिटेड ही आघाडीची नॉन- बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन – मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन (एनबीएफसी- एमएफआय) यांनी आज कव्हरफॉक्ससह धोरणात्मक भागिदारी केल्याचे जाहीर केले. कव्हरफॉक्स ही विमा ब्रोकर कंपनी या भागिदारीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे. गुरगाव येथे झालेल्या या करारात ग्रामीण भारतात आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी एकत्रित बांधिलकी जपण्याचा निश्चय केला गेला.
या धोरणात्मक भागिदारीअंतर्गत सॅटिन क्रेडिटकेयरच्या ग्राहकांना बजाज अलियान्झ लाइफच्या खास तयार करण्यात आलेल्या विमा योजनांचा देशभरातील १३८६ शाखांद्वारे लाभ घेता येणार आहे. यामुळे ग्राहकांना दुर्देवी घटना घडली, तरी आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुरक्षित राहाण्याचे समाधान मिळेल. या बागिदारीनुसार कव्हरफॉक्सच्या तंत्रज्ञान सुविधा विमा खरेदी, विक्री, आणि सेवेसाठी डिजिटल पातळीवर वापरल्या जाणार आहेत.
या भागिदारीविषयी बजाज अलियान्झ लाइफचे प्रमुख वितरण अधिकारी, इन्स्टिट्यूशनल धीरज सेहगल म्हणाले, ‘कव्हरफॉक्सच्या सहकार्याने बजाज अलियान्झ लाइफ आणि सॅटिन क्रेडिटकेयर यांच्यातील भागिदारी ग्राहकांना आर्थिक सुरक्षा मिळवून देईल. यामुळे ग्राहकांना निश्चिंत होऊन आपल्या जीवन ध्येयांचा पाठपुरावा करता येईल. ग्राहकांना पुरेसे आणि प्रभावी जीवन विमा कवच देणे आणि दुर्देवी घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबाची जीवन ध्येये सुरक्षित राहातील याची खात्री करणे हे आमचे ध्येय आहे.’
सॅटिन क्रेडिटकेयर नेटवर्क लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. एचपी सिंग या भागिदारीविषयी आनंद व्यक्त करत म्हणाले, ‘बजाज अलियान्झ लाइफ आणि कव्हरफॉक्स यांच्यासह झालेल्या भागिदारीचा आम्हाला आनंद झाला आहे. यामुळे ग्राहकहित केंद्रस्थानी ठेवून एका नव्या, क्रांतीकारी प्रवासाची सुरुवात झाली आहे. ही भागिदारी आमच्या तीन दशलक्ष ग्राहक परिवाराला सक्षम करण्यासाठी तसेच त्यांना सुरक्ष कवच पुरवण्यासाठी कंपनीने हाती घेतलेल्या मोहिमेचाच एक भाग आहे. आम्हाला विश्वास वाटतो, की या भागिदारीमुळे आमच्या ग्राहकांना सर्वसमावेशक सुरक्षा मिळेल आणि आत्मविश्वासाने आयुष्यातील अनिश्चिततेचा सामना करता येईल. आम्ही कत्रितपणे या क्षेत्रात तसेच ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यात नवी समीकरणे आणि नवे मापदंड प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहोत.’
कव्हरफॉक्स समूह कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीब झा म्हणाले, ‘बजाज अलियान्झ लाइफ आणि सॅटिन क्रेडिटकेयर यांच्यासह करण्यात आलेल्या भागिदारीच्या माध्यमातून दुर्गम व ग्रामीण भागातील ग्राहकांना सक्षम करण्याचे ध्येय आहे. त्यांना आर्थिक जोखमीविरोधात संरक्षण पुरवणे तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना या सेवा सहजपणे उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. आमच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने या दोन कंपन्यांना सहकार्य करताना आणि देशभरात आर्थिक सर्वसमावेशकता वाढवण्याच्या त्यांच्या ध्येयाला हातभार लावताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास वाटतो, की या भागिदारीमुळे बाजारपेठेतील या कंपन्यांचे वैयक्तिक स्थान बशकट होईल, शिवाय मायक्रो- फायनान्स क्षेत्रात नाविन्य आणि विकासाला चालना मिळेल. बजाज अलियान्झ लाइफ आणि सॅटिन क्रेडिटकेयर यांच्यासह केलेल्या भागिदारीमध्ये आम्हाला अफाट क्षमता दिसून येते. एकत्रितपणे आम्ही ग्राहकांना असामान्य सेवा देण्याचे ठरवले आहे.’


