Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोदरेज कॅपिटलची उपकंपनी, गोदरेज फायनान्स लिमिटेडची एमएसएमईसाठी एलएपी क्रेडिट वाढवण्यासाठी मुथूट फिनकॉर्पसोबत...

गोदरेज कॅपिटलची उपकंपनी, गोदरेज फायनान्स लिमिटेडची एमएसएमईसाठी एलएपी क्रेडिट वाढवण्यासाठी मुथूट फिनकॉर्पसोबत भागीदारी

आर्थिक वर्ष 26 मध्ये 250 कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट.

 

· मुथूट फिनकॉर्पच्या भारतातील 3,700+ शाखांद्वारे टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये एमएसएमईंना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गोदरेज फायनान्सची भागीदारी

 

 

 

मुंबई, 18 सप्टेंबर 2025: गोदरेज कॅपिटल ही गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा शाखा आहे. याच गोदरेज कॅपिटलची उपकंपनी, गोदरेज फायनान्सने (GFL) मुथूट फिनकॉर्पसोबत कर्ज देण्यासाठी भागीदारी केली आहे. यामुळे टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये एमएसएमईसाठी कर्ज उपलब्धता वाढेल. या भागात असलेली मुथूट फिनकॉर्पची मजबूत उपस्थिती, मक्तेदारी आणि त्यांचा विस्तार याच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

 

या भागीदारीत 10 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतच्या मालमत्तेवर कर्ज मिळेल, ज्यासाठी सरासरी तिकीट साईझ 15 लाख रुपये आहे. देशभरात पसरलेल्या या ऑपरेशन्समुळे कर्जाची मागणी असलेल्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. लवकरच ही भागीदारी वाढवून सोने कर्ज आणि गृह कर्ज यासारख्या इतर उत्पादनांचा यात समावेश केला जाईल.

 

 

 

डिजिटल एकत्रीकरणाद्वारे, ही भागीदारी जलद मंजुरी, अधिक पारदर्शकता आणि आरबीआयच्या कर्जसंबंधीच्या नियमांचे पालन करेल. कराराच्या अटींनुसार, कंपनी 80% जोखीम घेईल, तर मुथूट फिनकॉर्प उर्वरित 20% जोखीम उचलेल. यासोबतच मुथूट फिनकॉर्प अंडररायटिंग, कलेक्शन आणि ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करेल, तर कंपनी एकत्रितपणे आखलेल्या धोरणांच्या माध्यमातून अनुपालन सुनिश्चित करेल.

 

 

 

गोदरेज कॅपिटलचे एमडी आणि सीईओ मनीष शाह म्हणाले, “वाढत्या व्यवसायासाठी वेळेवर कर्ज मिळाल्याने खूप फरक पडू शकतो. विशेषतः टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये जिथे त्याची सर्वाधिक गरज आहे. मुथूट फिनकॉर्पसोबतच्या आमच्या भागीदारीद्वारे एमएसएमईंसाठी, सोप्या, पारदर्शक आणि जलद कर्ज देण्याच्या पद्धती राबवून ही तफावत भरून काढण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. व्यवसायांना वाढण्याचे बळ देण्यासोबतच वित्तीय प्रणाली अधिक मजबूत आणि सशक्त तसेच सर्वसमावेशक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

 

 

 

मुथूट फिनकॉर्पचे सीईओ शाजी वर्गीस म्हणाले, “शेतीनंतर देशात रोजगार निर्मितीमध्ये एमएसएमईंचे सर्वात मोठे योगदान आहे. मात्र, कर्ज मिळणे हे या क्षेत्रासमोरील एक महत्त्वाचे आव्हान आहे. आमच्या 3700+ शाखा आणि मुथूट फिनकॉर्प वन ऍपसह, आम्ही या एमएसएमईचा प्रवेश निश्चित करण्यासाठी दुर्गम भागांपर्यंत आमचा विस्तार केला आहे. गोदरेज कॅपिटलसोबतच्या आमच्या या नवीन भागीदारीमुळे आम्ही एमएसएमईच्या आर्थिक गरजा वेळेवर आणि प्रभावीपणे पूर्ण करून त्यांच्या वाढीस आणखी हातभार लावू, याची मला खात्री आहे.”

 

 

 

उपकंपनी GFL द्वारे, कंपनी MSME आणि वैयक्तिक कर्जदारांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे कर्ज पर्याय उपलब्ध करून देते. यामध्ये मालमत्तेवरील कर्ज, लहान तिकिटांसाठी मालमत्तेवर उद्योग कर्ज आणि असुरक्षित व्यवसाय कर्जे अशा ऑफर उपलब्ध आहेत.

 

 

 

या आर्थिक वर्षात, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भारतातील उच्च-क्षमतेच्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत या भागीदारीचे लक्ष्य 250 कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे आहे. एनबीएफसींमधील काही कर्ज भागीदारांपैकी एक म्हणून, ते एक मजबूत डिजिटल-प्रथम दृष्टिकोन प्रतिबिंबित करते. तसेच वेगाने वाढणाऱ्या एमएसएमई कर्ज क्षेत्रात व्यापक सहभागासाठी पाया तयार करते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments