Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोणताही रंग, एकच किंमत’ मोहिमेसह जेएसडब्ल्यू पेंट्सने किमतीत पारदर्शकता आणण्यासोबतच आणि ग्राहकांचाही...

कोणताही रंग, एकच किंमत’ मोहिमेसह जेएसडब्ल्यू पेंट्सने किमतीत पारदर्शकता आणण्यासोबतच आणि ग्राहकांचाही फायदा केला

डब्बा पढो, बचत करो” या सोप्या संदेशासह आलिया भट्ट आणि दुलकर सलमान या लोकप्रिय कलाकारांनी जेएसडब्ल्यू पेंट्सच्या मोहिमेचे नेतृत्व केले

 

 

यूट्युब लिंक:

 

 

 

मुंबई, 22 सप्टेंबर 2025: भारतातील आघाडीची पर्यावरणपूरक पेंट्स कंपनी जेएसडब्ल्यू पेंट्स आपल्या ग्राहकांसाठी उत्सवाचा काळ अधिक रंगीत आणि आनंदी बनवण्यासाठी सज्ज आहे.

 

 

 

23 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या जेएसडब्ल्यू ग्रुपचा भाग असलेल्या या कंपनीने त्यांच्या डेकोरेटिव्ह रंगांच्या श्रेणीसाठी त्यांच्या नवीन मोहिमेची सुरुवात केली. ब्रँडच्या ‘कोणताही रंग, किंमत एकच’ या वचनाला ही मोहीम एका साध्या संदेशासह बळकटी देते. ज्यामुळे ग्राहकांसोबत पारदर्शकता राहतेच पण बचतीची संधी मिळते. ही नवीन मोहीम प्रमुख टीव्ही चॅनेल, डिजिटल आणि इतर प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार आहे.

 

या जाहिरातीची मूळ संकल्पना TBWA ची आहे, जी कंपनीचे ब्रँड अँबेसेडर आलिया भट्ट आणि दुलकर सलमान यांच्यावर चित्रित करण्यात आली आहे. या जाहिरातीतून हलक्याफुलक्या वातावरणात विचार करायला लावणारा संदेश देण्यात आला आहे. उत्सुकता आणि प्रश्न विचारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सवालिया या प्रतिष्ठित पात्राचे देखील यात चित्रण केले आहे. रंगासाठी काहीही जास्तीचे नाही या ब्रँडच्या वचनाला पाठिंबा देतो.

 

सवालिया आयुष्यातील एक महत्त्वाचे सत्य अधोरेखित करतात – ग्राहक दररोजच्या उत्पादनांवरील लेबल्स काळजीपूर्वक वाचतात, परंतु बहुतेकदा ते पेंट पॅकवर काय लिहिले आहे याकडे दुर्लक्ष करतात. पेंट पॅकवरील या लेबलकडे आलिया दुलकरचे लक्ष वेधून घेते आणि जेएसडब्ल्यू पेंट्सच्या पारदर्शक किमतीच्या मॉडेलचे समर्थन करते. यामुळे ग्राहकांची 15% पर्यंत बचत होते. जाहिरातीचा शेवट सवालियाचा एक विचारी सल्ला – ‘डब्बा पढो, बचत करो’ने होतो. त्यानंतर ब्रँडचे थिंक ब्युटीफुलचे मूळ तत्त्वज्ञान देखील आहे.

 

या मोहिमेबद्दल जेएसडब्ल्यू डेकोरेटिव्ह पेंट्सचे सीईओ आशिष राय म्हणाले,

 

“आपल्या देशातील ग्राहक वापरत असलेल्या उत्पादनांबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल खूप जागरूक असतात. अन्न, आरोग्य तसेच लाइफस्टाइल उत्पादनांवरील लेबल्स वाचतात. मात्र, जेव्हा रंगांचा विचार होतो तेव्हा ही जागरूकता कमी असते. आमच्या या नवीन जाहिरातीद्वारे, आम्ही याबद्दलची जाणीव करून देण्याचा तसेच रंगांच्या बाबतीतही तीच जागरूकता आणण्याचा प्रयत्न करतो. ‘कोणताही रंग, एक किंमत’ हे आमचे ब्रँड वचन एक स्पष्ट संदेश देते – ग्राहकांसाठी पारदर्शकता आणि बचत सुनिश्चित करणे. हे आमच्या ब्रँडचे थिंक ब्युटीफुल तत्त्वज्ञान प्रतिबिंबित करते, जिथे प्रत्येक नवीन उपक्रम विचारपूर्वक राबवला जातो.”

 

टीबीडब्ल्यूए\इंडियाचे सीईओ गोविंद पांडे म्हणाले, “जेएसडब्ल्यू पेंट्स हा एकमेव ब्रँड आहे जो सर्व रंग एकाच किमतीत देतो, हे ही जाहिरात सिद्ध करते. सवालिया हा आमचा स्मार्ट, जागरूक ग्राहक आहे जो नवनवीन ग्राहकांना सहभागी होण्यास तसेच जागरूक होण्यासाठी प्रवृत्त करतो.”

 

TBWA\India चे चीफ क्रिएटिव्ह एक्सपिरीयन्स ऑफिसर रसेल बॅरेट म्हणाले, “सवालियाला पुनरुज्जीवित करणे हा एक भावनिक अनुभव आहे. ते केवळ त्याचे पुनरुज्जीवन नाही तर ग्राहकांना जागरूक करण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. या युगात आपण प्रामुख्याने पॅकमध्ये काय आहे याबद्दल खूप जागरूक असतो. आपण उत्पादन निवडताना ते अनेकदा ब्रँड बघून निवडतो. असे असले तरी त्याबद्दलही जागरूक असणारा, नेहमीच प्रश्न विचारणारा, आकर्षक सवालिया प्रेक्षकांना पेंट्समध्येही तसेच प्रश्न विचारण्याची मानसिकता ठेवण्यास सांगतो.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments