Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedमेडिकॅप हेल्थकेअर लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

मेडिकॅप हेल्थकेअर लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

 

 

मेडिकॅप हेल्थकेअर लिमिटेड (“कंपनी”) ने मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केला आहे.

 

कंपनी ही भारतीय औषधनिर्माण पॅकेजिंग क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी असून युरो हेड कॅप्स आणि बॉटल प्रीफॉर्म्स यांसह फार्मास्युटिकल क्लोजर्सच्या उत्पादनात कंपनीचे विशेष कौशल्य आहे.

 

आर्थिक वर्ष 2025 पर्यंत, कंपनीच्या कामकाजातील मह्सुलापैकी 80.02% हा देशांतर्गत विक्रीतून आणि उर्वरित 19.98% हा 14 देशांतील निर्यातीतून आहे. कंपनीकडे जागतिक बाजारपेठेत अंदाजे 1.4% बाजारपेठीय हिस्सा आहे आणि युरो हेड कॅप्ससाठी देशांतर्गत 40.00% पेक्षा जास्त मार्केट शेअर आहे. (स्त्रोत: F&S अहवाल).

 

कंपनी प्राथमिक समभाग विक्रीद्वारे निधी उभारण्याची योजना आखत आहे. एकूण इश्यू साईज मध्ये 2,400 दशलक्ष रु. (240 कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू आहेत (“Total Issue Size”). यात कोणताही ऑफर फॉर सेल घटक नाही.

 

ऑफरचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहे: (i) साधारण 743.70 दशलक्ष रु. पर्यंत (74.37 कोटी रु.) विद्यमान उत्पादन युनिटसाठी प्लांट आणि मशिनरी खरेदी करणे;

(ii) साधारण 329.00 दशलक्ष रु. (32.90 कोटी रु.) पर्यंत कंपनीने घेतलेल्या काही कर्जाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड (iii) उपकंपनी केएएसआर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये गुंतवणूक, त्याद्वारे कंपनीने घेतलेल्या साधारण 528.00 दशलक्ष रु. (52.80 कोटी रु.) पर्यंत

काही कर्जाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड (iv) शिल्लक रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टासाठी वापरण्यात येईल. (“Objects of the Offer”)

 

आर्यमन फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हे या इश्यूचे एकमेव बुक रनिंग लीड मॅ

नेजर आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments