Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedयुनिक्लोचे पुण्यात पदार्पण !

युनिक्लोचे पुण्यात पदार्पण !

26 सप्टेंबर 2025, पुणे, भारत – जागतिक पातळीवरील आघाडीचा कॅज्युअल वेअर किरकोळ विक्रेते युनिक्लोने आता पुण्यात पदार्पण केले आहे. पुण्यातील द पॅव्हेलियन येथे त्यांनी आपले पहिले स्टोअर सुरू केले. यामुळे पश्चिम भारतातील अधिकाधिक लोकांसाठी हे लाइफवेअर उपलब्ध झाले आहेत. या नवीन स्टोअरमध्ये ग्राहकांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यात पुणेकरांना उत्तम दर्जाचे, विचारपूर्वक डिझाइन केलेले तसेच समारंभासाठीचे कपडे उपलब्ध होते. तसेच त्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष ऑफरही होत्या. ब्रँड देशभरात आपली उपस्थिती वाढवण्याच्या प्रयत्नात असून हे युनिक्लोचे भारतातील 18 वे स्टोअर आहे.

 

“पुण्यात द पॅव्हेलियन येथे आमचे पहिले स्टोअर उघडताना आणि पुणेकरांसाठी युनिक्लोचे लाइफवेअर आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्या ऑनलाइन स्टोअरला पुण्यातील ग्राहकांकडून मिळालेल्या पाठिंब्यासाठी आम्ही आभारी आहोत. याच पाठिंब्याच्या आधारे आता विद्यमान आणि नवीन ग्राहकांना युनिक्लो श्रेणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत. पुणे हे एक उत्साही, वाढणारे शहर आहे आणि आम्हाला येथे विस्तारासाठी अधिक क्षमता दिसते आहे. लोकांना साधे पण उत्तम प्रतीचे कपडे – रोजच्या वापरासाठी असे डिझाइन केलेले हीच लाइफवेअरची ओळख आहे,” असे युनिक्लो इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केंजी इनोई म्हणाले.

 

तळमजल्यावरील सुमारे 9,000 चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले, युनिक्लो द पॅव्हेलियन स्टोअर ब्रँडच्या सिग्नेचर लाइफवेअर कलेक्शनची विस्तृत श्रेणी ऑफर करते. यात पुरुष, महिला, मुले आणि बाळांच्या कपड्यांचा समावेश आहे. यात एअरिझम, हीटटेक सारखे नावीन्यपूर्ण कापड आणि जागतिक स्तरावर लोकप्रिय ब्राटॉप्स, डेनिम आणि अन्य बऱ्याच वस्तूंचा समावेश आहे.

 

या नवीन स्टोअरचा आनंद साजरा करण्यासाठी, युनिक्लोने ग्राहकांना विशेष लाँच ऑफर दिल्या आहेत. पहिल्या 100 खरेदीदारांना आयहॉप कॅफेकडून मोफत कॅपुचिनो आणि वॅफल कूपनसह युनिक्लोच्या सर्वात आवडत्या उत्पादनांपैकी एक असलेली एक मोफत राउंड अल्ट्रा मिनी बॅग देण्यात आली. ₹5000 आणि त्याहून अधिक किमतीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पुण्यातील कलाकार अनुष्का हर्डीकर यांनी डिझाइन केलेली कमी प्रमाणात असलेली टोट बॅग देखील मिळाली. ब्रँडच्या नावीन्यपूर्ण, शैली आणि स्थानिक संस्कृतीचे मिश्रण करून आकर्षक खरेदी अनुभव निर्माण करण्याच्या ध्येयाला या उपक्रमामुळे पाठबळ मिळाले. या लाँच उत्सवाचा एक भाग म्हणून तसेच शहरातील उत्साही कॉर्पोरेट तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधता यावा यासाठी पंचशील बिझनेस पार्क आणि पंचशील टेक पार्क वन यासारख्या प्रमुख टेक पार्कमध्ये, सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठासह महाविद्यालयांमध्ये लाइफ-साईज युनिक्लो ब्रँडेड क्युबिकल्स ठेवण्यात आले होते.

 

 

स्टोअरचा आढावा

 

दुकानाचे नाव: UNIQLO द पॅव्हेलियन, पुणे

 

पत्ता: द पॅव्हेलियन मॉल, सेनापती बापट रोड, जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या शेजारी, लक्ष्मी सोसायटी, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र, 411016

 

स्टोअरचे क्षेत्रफळ: अंदाजे 9,000 चौरस फूट

 

शुभारंभाचा तारीख: 26 सप्टेंबर 2025.

 

युनिक्लो आणि त्याच्या कलेक्शनबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया वेबसाइटला भेट द्या किंवा युनिक्लो इंडिया अधिकृत ऍप डाउनलोड करा.

 

युनिक्लो इंडिया संकेतस्थळ: www.uniqlo.com/in

युनिक्लो इंडिया अधिकृत इन्स्टाग्राम हॅंडल: https://www.instagram.com/uniqloin/

युनिक्लो इंडिया अधिकृत फेसबूक पेज: https://www.facebook.com/uniqloin

युनिक्लो इंडिया अधिकृत ट्विटर हॅंडल: https://twitt

er.com/UniqloIn

 

#####

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments