20 फेब्रुवारी, 2024, पुणे: फिनोलेक्स केबल्स लिमिटेड., हा ऑप्टीक फायबर केबल्स क्षेत्रातील प्रमुख मातब्बर असून औद्योगिक विभाग, महाराष्ट्र शासनासह सामंजस्य करार (एमओयू) करत आर्थिक वाढीला चालना देणे आणि विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ही रणनीतिजन्य भागीदारीला केंद्रस्थानी ठेवत फिनोलेक्स केबल्सने रु 580 कोटींची महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे, कंपनीच्या विस्ताराच्या दृष्टीने ऑप्टीक फायबर केबल्स इंडस्ट्रीत मापदंड ठरतो.
देशातील प्रत्येक गावाला शेवटच्या टप्प्यातील ऑप्टिकल फायबर-आधारित कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाशी ही गुंतवणूक धोरणात्मकदृष्ट्या सुसंगत आहे. मागणीत वाढ होण्याची अपेक्षा बाळगून, फिनोलेक्स केबल्स देशभरात 5 जी रोल-आउट आणि फायबर-टू-होम कनेक्टिव्हिटीची वाढती आवश्यकता पाहता, ऑप्टिक फायबर केबल्सची (ओएफसी) वाढती गरज पूर्ण करण्यासाठी स्वतःला तयार करत आहे.
ऑप्टीक फायबर केबल्स क्षेत्रात आपली क्षमता आणि उत्पादन श्रेणी बळकट करण्यासाठी फिनोलेक्स केबल्सची वचनबद्धता अधोरेखित करत, कंपनीकडे सध्या दरवर्षी 4 मिलियन फायबर किमीची फायबर ड्रॉईंग क्षमता आणि दरवर्षी तब्बल 8 मिलियन फायबर किमीची केबलिंग क्षमता आहे. या विस्तार उपक्रमांत फायबर ड्रॉ टॉवर्सची स्थापना आणि फायबर ड्रॉ प्रक्रियेत महत्त्वपूर्ण असलेल्या काचेच्या प्रीफॉर्म्सच्या उत्पादनासाठी बॅकवर्ड इंटिग्रेशनची अंमलबजावणी समाविष्ट आहे. विशेष म्हणजे, हे भारत सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या उद्दिष्टांशी साजेसे ठरते.
ऑप्टिकल फायबर उत्पादनासाठी एक महत्त्वाचा घटक असलेल्या काचेच्या प्रीफॉर्म्सचे उत्पादन करणारी देशातील दुसरी कंपनी बनण्याचे फिनोलेक्स केबल्सचे उद्दिष्ट आहे. प्रस्तावित अद्ययावतीकरणामुळे ड्रॉ टॉवरची क्षमता दुप्पट होऊन दरवर्षी 8 मिलियन फायबर कि. मी. होईल, ज्यामुळे फायबर ऑप्टिक केबल्सची वार्षिक क्षमता सध्याच्या 8 मिलियन फायबर कि. मी. वरून 10 मिलियन फायबर कि. मी. होईल. या विस्तार उपक्रमामुळे 400 हून अधिक व्यक्तींसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.
या सामंजस्य करारातील अटींनुसार, महाराष्ट्र सरकारने संबंधित राज्य विभागांकडून आवश्यक नोंदणी आणि मंजुरी मिळविण्यासाठी फिनोलेक्स केबल्स लिमिटेडला सक्रियपणे पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. या सहकार्यामुळे फिनोलेक्स केबल्सच्या महत्वाकांक्षी विस्तार प्रकल्पाची अखंड आणि यशस्वी अंमलबजावणी सुलभ होईल आणि या प्रदेशाच्या आर्थिक विकासात तसेच रोजगार संधींमध्ये लक्षणीय योगदान मिळेल अशी अपेक्षा आहे.
यावेळी बोलताना, फिनोलेक्स केबल्स लिमिटेड, डेप्युटी सीईओ आणि सीएफओ, महेश विश्वनाथन यांनी विस्तार योजना आणि महाराष्ट्र सरकारबरोबरच्या सहकार्यात्मक प्रयत्नांबद्दल उत्साह व्यक्त केला. “ही धोरणात्मक गुंतवणूक राज्याच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासोबत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याविषयी आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते. आम्ही महाराष्ट्र सरकारच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आमच्या विस्तार प्रकल्पाच्या अखंड व यशस्वी अंमलबजावणीसाठी आम्ही उत्सुक आहोत.”
ओएफसी व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी, कंपनीने देशभरातील विविध ठिकाणी फायबर- ऑप्टीक केबल नेटवर्क विस्तारण्याच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी ईपीसी विभागही उघडला आहे. गुजरातमध्ये या व्यवसायाची सुरुवात अगोदरच झाली असून लवकरच इतर भौगोलिक प्रदेशांमध्येही त्याचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे.


