Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedनेक्‍स्‍टवेव्‍हच्‍या संस्‍थापकांचा द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्‍या कॉलेजमधील विद्यार्थ्‍यांना सक्षम करण्‍यासाठी शैक्षणिक...

नेक्‍स्‍टवेव्‍हच्‍या संस्‍थापकांचा द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्‍या कॉलेजमधील विद्यार्थ्‍यांना सक्षम करण्‍यासाठी शैक्षणिक श्रेणीतील प्रतिष्ठित फोर्ब्‍स इंडिया ३० अंडर ३० पुरस्‍कारासह सन्‍मान

राष्‍ट्रीय, फेब्रुवारी 21, 2024: भारतातील आघाडीचा एडटेक व अपस्किलिंग प्लॅटफॉर्म नेक्‍स्‍टवेव्‍हने उत्तम कामगिरी केली आहे, जेथे व्‍यासपीठाचे सह-संस्‍थापक शशांक रेड्डी गुज्‍जुला आणि अनुपम पेडर्ला यांना फोर्ब्‍स ३० अंडर ३० पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले आहे. या प्रतिष्ठित सन्‍मानामधून द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्‍या इंजीनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्‍यांना सक्षम करत भारतातील टेक होरिझोन ४.० ला चालना देण्‍याप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते. हा पुरस्‍कार ३० प्रमुखांना उद्योगांमधील त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय कामगिरीसाठी प्रशंसित करतो. गेल्‍या वर्षी प्लॅटफॉर्मने २७५ कोटी रूपयांचा उल्‍लेखनीय सिरीज ए निधी संपादित केल्‍यानंतर हे उल्‍लेखनीय यश मिळाले आहे.

हा सन्‍मान उच्‍च स्‍पर्धात्‍मक स्थितीमधून मिळाला असल्‍यामुळे विशेषत: उल्‍लेखनीय आहे, जेथे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्‍ट्री अँड इंटर्नल ट्रेड (डीपीआयआयटी) ने देशभरातील ५५०० हून अधिक मान्‍यताकृत एडटेक स्‍टार्टअप्‍सची नोंदणी केली. शैक्षणिक श्रेणीमधील एकमेव प्रतिनिधी म्‍हणून नेक्‍स्‍टवेव्हच्‍या सह-संस्‍थापकांच्‍या निवडीमधून क्षेत्राप्रती त्‍यांचे व्‍यापक योगदान दिसून येते.

मॉर्गन स्‍टॅण्‍ली यांच्‍या अहवालानुसार भारतातील आयटी क्षेत्र या दशकामध्‍ये तिप्‍पट विकास करण्‍याची अपेक्षा आहे. अनेक संधी असताना देखील विद्यार्थ्‍यांना उद्योगाशी संबंधित कौशल्‍यांच्‍या कमतरतेमुळे रोजगार मिळण्‍यामध्‍ये समस्‍यांचा सामना करावा लागतो. शशांक व अनुपम यांनी अनुक्रमे आयआयटी बॉम्‍बे आणि आयआयटी खरगपूर येथून पदवी शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर ही समस्‍या ओळखली, तसेच या समस्‍येचे निराकरण करण्‍याचा निर्धार केला. त्यांनी आकर्षक नोकरीच्या ऑफर नाकारल्या आणि राहुल अत्तुलुरी (आयआयआयटी हैदराबाद पदवीधर) यांच्‍यासोबत सहयोगाने नेक्‍स्‍टवेव्‍हची स्थापना केली, ज्‍यामागे तरूणांना आधुनिक इंडस्ट्री ४.० तंत्रज्ञान कौशल्यांसह सुसज्ज करण्‍याचा आणि विश्वसनीय प्लेसमेंट सपोर्ट प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे.

तेव्‍हापासून नेक्‍स्‍टवेव्‍ह देशातील झपाट्याने विकसित होणारी एडटेक स्‍टार्टअप बनली आहे आणि स्‍थानिक भाषांमध्‍ये टेक करिअरसाठी अपस्किलिंगवर लक्ष केंद्रित करते. फक्‍त ४ वर्षांमध्‍ये २८ राज्‍ये व ५ केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यार्थ्‍यांनी कंपनीच्‍या टेक-केंद्रित सीसीबीपी ४.० अकॅडमी आणि इंटेन्सिव्‍ह २.० प्रोग्राम्‍समध्‍ये नोंदणी केली आहे. नेक्‍स्‍टवेव्‍हने देशभरातील ३,५०० हून अधिक कॉलेजमध्‍ये एक लाखाहून अधिक प्रबळ विद्यार्थी समुदाय देखील निर्माण केला आहे.

नेक्‍स्‍टवेव्‍हचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अनुपम पेडर्ला म्‍हणाले, ”तरूण आपल्‍या देशाची ताकद आहेत. त्‍यांना योग्‍य कौशल्‍यांसह सुसज्‍ज केल्‍यास ते भारताला जागतिक अग्रणी देश बनवू शकतात. आमचा देशाच्‍या कानाकोपऱ्यापर्यंत जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिक्षण देण्‍याचा मनसुबा आहे. आमचा दृढ विश्‍वास आहे की, प्रत्‍येक विद्यार्थ्‍यामध्‍ये व्‍यापक क्षमता आहे आणि योग्‍य मार्गदर्शनासह ते अविश्‍वसनीय यश संपादित करू शकतात. आमच्‍या नेक्‍स्‍टवेव्‍ह विद्यार्थ्‍यांनी वेळोवेळी ही बाब सिद्ध करून दाखवली आहे. फोर्ब्‍सकडून या सन्‍मानामधून नेक्‍स्‍टवेव्‍ह हजारो तरूणांच्‍या जीवनात घडवून आणत असलेला आमूलाग्र बदल सार्थ ठरतो.”

नेक्‍स्‍टवेव्‍हचे सह-संस्‍थापक आणि कस्‍टमर एक्‍स्‍पेरिअन्‍सचे प्रमुख शशांक रेड्डी गुज्‍जुला म्‍हणाले, ”हा सन्‍मान फक्‍त वैयक्तिक यश नसून त्‍यामधून नेक्‍स्‍टवेव्ह टीमची, तसेच उत्तम करिअर घडवण्‍यासाठी सतत मोठी स्‍वप्‍ने पाहण्‍यासोबत शिक्षण घेणाऱ्या आमच्‍या विद्यार्थ्‍यांची अथक मेहनत दिसून येते. असे सन्‍मान आम्‍हाला तरूणांना तंत्रज्ञान क्षेत्रातील व्‍यापक संधींसाठी सुसज्‍ज करण्‍याच्‍या आमच्‍या ध्‍येयाला पूर्ण करण्‍यास अधिक प्रेरित करतात.”

गेल्‍या काही वर्षांमध्‍ये स्‍टार्टअपने आपल्‍या विद्यार्थ्‍यांना यशस्‍वीपणे रोजगार मिळण्‍याची सुविधा देण्‍याकरिता १७०० हून अधिक कंपन्‍यांसोबत सहयोग केला आहे, ज्‍यामध्‍ये अमेझॉन, गुगल, बँक ऑफ अमेरिका अशा मोठ्या कंपन्‍यांचा समावेश आहे. भारतातील तरूणांसाठी प्‍लेसमेंट्स सुधारण्‍याच्‍या आपल्‍या मिशनला अधिक दृढ करत कंपनी पुढील २ वर्षांमध्‍ये विद्यार्थ्‍यांना रोजगार मिळवून देण्‍यासाठी १०,००० कंपन्‍यांना ऑनबोर्ड करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments