Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची मुलाखत

दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची मुलाखत

मुंबई, दि. 6: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. तर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार, दि. 10, शनिवार दि. 11 आणि सोमवार दि.13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ या मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. ही मुलाखत निवेदिका सुषमा जाधव यांनी घेतली आहे.

 

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

 

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

 

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभाग विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवत आहे. या योजनांचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण, बालकांचे आरोग्य व पोषण, तसेच त्यांच्या शिक्षण आणि सुरक्षेला बळकटी देणे हा आहे. यामध्ये लाडकी बहिण योजना, पोषण आहार योजना, बालसंवर्धन योजना, वन स्टॉप सेंटर, बालसंरक्षण उपक्रम, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याशिवाय, आंगणवाडी सेवांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील बालकांना शिक्षण, पोषण व आरोग्याची सोय उपलब्ध करून दिली जाते. या योजना आणि उपक्रमांमुळे राज्यातील हजारो महिला व बालकांना नव संजीवनी लाभत असून समाजातील दुर्बल घटक मुख्य प्रवाहात येत असून याची अंमलबजावणी व नियोजन कशा प्रकारे करण्यात येत आहे, याविषयी सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

 

 

0000

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments