Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॅम्पसतर्फे नवीन, उठावदार स्नीकर पोर्टफोलिओ, अन्युअल रिटेलर मीट २०२५ मध्ये स्त्रियांसाठी खास...

कॅम्पसतर्फे नवीन, उठावदार स्नीकर पोर्टफोलिओ, अन्युअल रिटेलर मीट २०२५ मध्ये स्त्रियांसाठी खास श्रेणी · नाविन्यपूर्ण डिझाइनप्रती बांधिलकी आणि रिटेलरवर प्राधान्य देणारा विकास

पुणे, ३० सप्टेंबर २०२५ – कॅम्पस अक्टिव्हवेयर लि. या भारतातील आघाडीच्या स्पोर्टस आणि अथलीझर ब्रँडने पुण्यात अन्युअल रिटेलर मीट २०२५ चे आयोजन केले असून त्यात या भागातील १८६ पेक्षा जास्त रिटेलर्स सहभागी होणार आहेत. विविध चॅनेल पार्टनर्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी ‘मूव्ह टुगेदर, ग्रो टुगेदर’ ही संकल्पना ठेवण्यात आली असून, ती कॅम्पसच्या मूव्ह युवर वे या ब्रँड तत्वावर आधारित आहे. रिटेल नेटवर्कच्या मदतीने प्रगती करण्यावर असलेला कंपनीचा भर यातून दिसून आला आहे.

 

 

 

ग्राहकांचा विश्वास आणि ब्रँड तसेच पार्टनर्समधील दैनंदिन नाते साजरे करणाऱ्या या कार्यक्रमात नवीन डिझाइन्स आणि धोरणात्मक योजना मांडण्यात आल्या होत्या. रिटेलर्सना ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी, विशेषतः फॅशन फर्स्ट स्नीकर्स, वुमन्स स्नीकर्स आणि कॅम्पसचे प्रमुख टेक एयर कॅप्सुल प्रो अशा मोठी मागणी असलेल्या उत्पादनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात आले.

 

 

 

‘आम्ही डिझाइन केलेल्या प्रत्येक डिझाइनची खरी क्षमता ते डिझाइन ग्राहकापर्यंत पोहोचल्यावरच पूर्ण होत असते आणि ते आमच्या रिटेलर्समुळे शक्य होते,’ असे कॅम्पस अक्टिव्हवेयर लि. चे पूर्ण वेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निखिल अगरवाल म्हणाले. ‘हा कार्यक्रम फक्त उत्पादने दर्शवण्यापुरता मर्यादित नाही, तर त्यात ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी आणि आमच्या एकत्रित प्रवासाची झलक त्यात पाहायला मिळेल. ट्रेंडमधे असलेल्या स्नीकर्सपासून स्त्रियांच्या अथलीझरपर्यंत आमचे पार्टनर्स देशभरात चालना देत आहेत.’

 

 

 

ब्रँडने भारताच्या दैनंदिन जीवनशैलीला साजेसा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ सादर केला असून त्यात स्टाइल, उपयुक्तता आणि आरामदायीपणा यांचा मेळ घालण्यात आला आहे. स्नीकरची लोकप्रियता आणि शहरी फॅशनवर असलेला त्याचा प्रभाव वाढत असून त्यात बोल्ड डिझाइन, मिनिमल इसेन्शियलपर्यंतच्या डिझाइन्सचा समावेश आहे. स्त्रियांसाठीच्या स्टाइलमध्ये ट्रेंडी डिझाइन्सचा प्रामुख्यान समावेश करण्यात आला असून त्यावरून तरुण भारतीय ग्राहकांकडून असलेली वाढती मागणी दिसून येते. या श्रेणीमध्ये सर्वांसाठी ओपन फुटवेयर आणि रोजच्या वापरासाठी तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या किड्स कलेक्शनचा समावेश करण्यात आला आहे.

 

 

 

शोकेस २०२५ या कॅम्पसच्या यावर्षाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या वितरकांच्या सर्वात मोठ्या कार्यक्रमाप्रमाणेच अन्युअल रिटेलर मीटमध्ये उत्साहपूर्ण वातावरण, वैविध्यपूर्ण, भविष्यवेधी डिझाइन्सचा पोर्टफोलिओ लाइव्ह डेमो आणि संवादी सेशन्समधून दिसून आला. या कार्यक्रमासाठी इतर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावत पार्टनर्सशी संवाद साधला. त्यातून ब्रँडची सर्वांसह विकास करण्याची बांधिलकी दिसून आली.

 

 

 

कॅम्पसच्या विस्तारित उत्पादन आर्किटेक्चरला तंत्रज्ञान, ग्राहकांची पसंती आणि डिझाइन्सची जोड देण्यात आली असून ही उत्पादने जीवनशैलीला साजेशी असतात. कंपनी २३,००० पेक्षा जास्त रिटेलर्सच्या माध्यमातून देशभरात कार्यरत असून डिजिटल विस्तारही वाढत आहे.

 

 

 

कॅम्पस वेगाने भारताचा सर्वात महत्त्वाकांक्षी आणि स्पोर्ट्स ब्रँड बनण्याच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असून रिटेलर मीट २-२५ ग्राहकांचा विश्वास, नाविन्य आणि एकत्रित प्रयत्नांचे प्रतीक ठरली आहे.

 

 

 

अधिक माहिती किंवा आमचे कलेक्शन खरेदी करण्यासाठी भेट द्या – www.campusshoes.com.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments