Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात सीआयआय तर्फे नेक्सजेन मोबिलिटी शो 2025 चे उद्घाटन

पुण्यात सीआयआय तर्फे नेक्सजेन मोबिलिटी शो 2025 चे उद्घाटन

पुणे,9 ऑक्टोबर 2025 : द कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय),पश्चिम विभाग तर्फे मोशी मधील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे 9 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2025 दरम्यान वाहन उद्योगासाठी नेक्सजेन मोबिलिटी शो 2025 या प्रदर्शन व परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हे या एक्स्पोचे तिसरे वर्ष असून इनोव्हेट.इंटिग्रेट.इम्पॅक्ट : द फ्युचर ऑफ मोबिलिटी या संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम वाहन उद्योगातील संपूर्ण मूल्यसाखळीला एकत्रित आणेल.

 

या एक्स्पोच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी सीआयआय पश्चिम विभागाच्या फ्युचर मोबिलिटी टास्क फोर्सचे अध्यक्ष व टाटा ऑटोकॉम्पचे उपाध्यक्ष अरविंद गोयल, सीआयआयच्या पश्चिम विभागाच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष व सीआयआय पश्चिम विभागाच्या फ्युचर मोबिलिटी टास्क फोर्सचे सहअध्यक्ष आणि झेडएफ समुहाचे अध्यक्ष आकाश पास्सी,सीआयआय पुणे झोनल कौन्सिलचे अध्यक्ष आणि आरएसबी ट्रान्समिशन्स इंडिया लि.चे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहरा, संशोधन विकास,अभिनवता व डिजिटलायझेशन विषयासाठी सीआयआयच्या पश्चिम विभागाच्या टास्क फोर्सचे सहअध्यक्ष,वरिष्ठ सल्लागार आणि आनंद ऑटोमोटिव्ह प्रा.लि.च्या अभिनवता व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख एमएस शंकर, हिरो मोटर्स कंपनी चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज मुंजाल , ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) चे संचालक डॉ.रेजी मथाई,व्हॅरॉकचे पूर्णवेळ संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन जैन आणि याझाकी इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांथ नायकउपस्थित होते .

 

उदघाटन समारंभानंतर झालेल्या सीआयआय ऑटोमोटिव्ह रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह 2025 हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले . भारतीय बाजारपेठेच्या गरजेनुरूप विस्तारक्षम, किफायती, भविष्य सज्ज अशा गतिशीलता उपायांची (सोल्युशन्स) उभारणी करण्यासाठी विविध भागधारकांत सहयोग, स्थानिकीकरण आणि संशोधन व विकास यांत अधिक गुंतवणुकीच्या गरजेवर तज्ज्ञांनी भर दिला. भारत विशेषतः वाहन तंत्रज्ञान जगतात लक्षणीय परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. या उभरत्या स्थितीत सुसंगत राहायचे असल्यास उपायांचे स्थानिकीकरण आणि किफायती उत्पादने विकसित करणे आवश्यक आहे. प्रगत तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे हा अडथळा नसला तरी हे उपाय व उत्पादने परवडणाऱ्या किमतीला वितरित करण्याचे प्रमुख आव्हान आहे असे मत विविध तज्ज्ञांनी मांडले . .

 

या एक्स्पोमध्ये व्यावसायिक वाहने,प्रवासी वाहने,धोरण आणि नियामक मार्गदर्शक तत्वे, ईव्ही व्यवसाय परिसंस्था विकास, शाश्वत चार्जिंग पायाभूत सुविधा, बॅटरी तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट, ऑटोमोटिव्ह मटेरियल्स, ऑटोमोटिव्ह लॉजिस्टिक्स, ईव्ही उत्पादन अभिनवता व गुंतवणूक, रॅपिड मेट्रो,हाय स्पीड ट्रेन्स,शहरी हवाई गतीशीलता आणि पायाभूत सुविधा विकास यासारख्या विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करतील.

 

10 ऑक्टोबर 2025 रोजी सीआयआय सॉफ्टवेअर आधारित मोबिलिटी कॉन्क्लेव्ह 2025 आणि 11 ऑक्टोबर रोजी एआरएआय – एएमटीआयएफ नवीग्यान या स्टार्टअप व इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह 2025 चे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments