गुरूग्राम, भारत – ऑक्टोबर १०, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज सकारात्मक ग्राहक भावना, आकर्षक उत्सवी डिल्स आणि टेलिव्हिजन्स व एअर कंडिशनर्सवर जीएसटी दर कपात या आधारावर उत्सवी विक्रीच्या उत्तम शुभारंभाची घोषणा केली.
सॅमसंगने सांगितले की, नवरात्री व दसरा सण कालावधीदरम्यान त्यांच्या प्रीमियम स्मार्टफोन्सच्या विक्रीने उच्च विक्रमी नोंद केली, ज्यामध्ये त्यांचे झेड फोल्ड७ फोल्डेबल स्मार्टफोन, गॅलेक्सी एस२५ सिरीज, तसेच गॅलेक्सी एस२४ सिरीजचा गॅलेक्सी एआय-समर्थित पोर्टफोलिओ अग्रस्थानी होता. गॅलेक्सी एआय सॅमसंगचे अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, जे सॅमसंग स्मार्टफोन्ससोबत वापरकर्त्यांचे परस्परसंवाद अधिक सर्वोत्तम, कार्यक्षम व वैयक्तिकृत करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
“यंदा ३०,००० रूपयांपासून किंमत असलेल्या प्रीमियम गॅलेक्सी स्मार्टफोन्सची विक्री गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १.४ पट वाढली. सॅमसंगला विश्वास आहे की, त्यांचे प्रीमियम एआय स्मार्टफोन्स शुभ दिवाळी सणादरम्यान उत्तम कामगिरी करत राहतील,” असे सॅमसंग इंडियाचे प्रवक्ता म्हणाले.
सॅमसंगने २२ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या नवरात्री विक्रीदरम्यान गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा, गॅलेक्सी एस२४ आणि गॅलेक्सी एस२४ एफई अशा प्रीमियम स्मार्टफोनसवर आकर्षक उत्सवी डिल्सची घोषणा केली होती.
टेलिव्हिजन विक्रीमध्ये मोठी वाढ झाली, ज्याला मोठ्या आकाराच्या टेलिव्हिजन्सवर (३२ इंचापेक्षा मोठे) जीएसटी दरांमधील कपातीचे पाठबळ मिळाले. सॅमसंगने सांगितले की, २२ सप्टेंबरपासून दोन आठवड्याच्या कालावधीदरम्यान ग्राहकांकडून त्यांच्या व्हिजन एआय-समर्थित प्रीमियम निओ क्यूएलईडी व ओएलईडी टेलिव्हिजन्सना प्रबळ मागणी मिळाली. सॅमसंग व्हिजन एआय स्क्रिन्सना सर्वोत्तम सोल्यूशन्समध्ये बदलते, ज्यामुळे दैनंदिन जीवन उत्साहित होते, वापरकर्त्यांचे दैनंदिन अनुभव सोपे होतात, त्यामध्ये अधिक उत्साहाची भर होते आणि ते सक्षम होतात.
“यंदा सॅमसंगच्या प्रीमियम टेलिव्हिजन्सची विक्री गेल्या वर्षीच्या त्याच उत्सवी कालावधीच्या तुलनेत दुप्पटीने वाढली, ज्याचे श्रेय अद्वितीय डिल्स, विस्तारित वॉरंटी, जीएसटी दर कपात आणि भारतात एआय टेलिव्हिजन्सच्या वाढत्या अवलंबनाला जाते. तसेच, नवरात्री कालावधीदरम्यान रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स व एसींची विक्री गेल्या वर्षीच्या त्याच कालावधीच्या तुलनेत १.३ पट वाढली. सॅमसंगला विश्वास आहे की, त्यांचे प्रीमियम निओ क्यूएलईडी व ओएलईडी टेलिव्हिजन्स आणि बीस्पोक एआय अप्लायन्सेस शुभ दिवाळी सणादरम्यान उत्तम कामगिरी करत राहतील,” असे सॅमसंग इंडियाचे प्रवक्ता म्हणाले.
नवरात्री उत्सवादरम्यान होम अप्लायन्सेसच्या विक्रीला गती मिळाली, जेथे ग्राहकांनी आकर्षक ऑफर्स व सूटचा फायदा घेतला. सॅमसंगने सांगितले की सणासुदीच्या काळाच्या पहिल्या टप्प्यादरम्यान त्यांच्या अप्लायन्स व्यवसायामध्ये प्रबळ वाढ दिसून आली, ज्याचे श्रेय आकर्षक डिल्सना जाते, ज्यामध्ये कॅशबॅक ऑफर्स, सुलभ फायनान्स आणि विस्तारित वॉरंटीला जाते. एसीच्या विक्रीला देखील जीएसटीमधील कपात, विस्तारित वॉरंटी फायदे आणि ऊर्जा बचतींमधून फायदा झाला.
सॅमसंगचे बीस्पोक एआय अप्लायन्सेस चार विशिष्ट ग्राहक फायद्यांवर आधारित आहेत: ईजी, केअर, सेव्ह आणि सेक्युअर, जे एआयच्या माध्यमातून ग्राहकांचे जीवन उत्साहित व
सोपे करतात.


