Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोकण विभागाच्या माजी प्र.उपसंचालक* *अर्चना गाडेकर-शंभरकर अनंतात विलीन*

कोकण विभागाच्या माजी प्र.उपसंचालक* *अर्चना गाडेकर-शंभरकर अनंतात विलीन*

 

 

*खारघर येथील अंत्यसंस्कार प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती*

 

नवी मुंबई, (विमाका) दि.16:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पालघर जिल्हा माहिती अधिकारी तथा कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक व प्रसिद्ध लेखिका अर्चना गाडेकर – शंभरकर ( वय 52 ) यांचे दीर्घ आजाराने बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 07.20 मिनिटांनी अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे निधन झाले. त्या मूळच्या चंद्रपूर येथील रहिवासी होत्या. कै. अर्चना शंभरकर यांच्यावर खारघर येथील स्मशानभूमीत आज दि. 16 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

याप्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती संचालक (प्रशासन) श्री. हेमराज बागूल, संचालक (माहिती) (वृत्त)श्री. किशोर गांगुर्डे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक श्री. प्रविण टाके, कोंकण विभागाचे प्र.उपसंचालक श्री. मनोज सानप, तसेच कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मधील अधिकारी व कर्मचारी, पत्रकार तसेच गाडेकर, शंभरकर यांच्या नातेवाईकांनी कै. अर्चना गाडेकर- शंभरकर यांच्या आठवणींना उजाळा देवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण केली.

 

कै. अर्चना शंभरकर यांच्या पश्चात त्यांचे पती प्रकाश शंभरकर, मुले डॉ.अप्रतिम व रीची शंभरकर, वडील भगवान गाडेकर,भाऊ डॉ. हेमंत गाडेकर, भाऊ अभिनेता जयंत गाडेकर, बहिण डॉ. मोना व बराच मोठा आप्तपरिवार आहे. अर्चना शंभरकर या प्रसिद्ध लेखिका होत्या. त्यांची ‘सोलमेट’ ही कादंबरी तर ‘सारीनास’ हा लघुकथा संग्रह प्रसिद्ध झाला होता. विदर्भातील सुप्रसिद्ध कवियित्री दिवंगत विमल गडेकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या.

 

000 000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments