Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedएसीपी पै. विजय चौधरी यांची ‘हिंदकेसरी २०२५-२६' कुस्ती स्पर्धेसाठी निवड

एसीपी पै. विजय चौधरी यांची ‘हिंदकेसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेसाठी निवड

पुणे, दि. १२ नोव्हेंबर, २०२५ : भारतीय शैली कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य भारतीय कुस्ती संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रीय कुस्ती संकुल, वडकी (पुणे) येथे पार पडलेल्या हिंदकेसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत नवी मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त तसेच सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेता व जागतिक पोलीस सुवर्णपदक विजेते पैलवान विजय चौधरी यांनी दमदार व ऐतिहासिक खेळी सादर करत हिंदकेसरी स्पर्धेसाठीची पात्रता मिळवली आहे.

 

येणाऱ्या १५ ते २० जानेवारी २०२६ दरम्यान सातारा जिल्हा येथे होणाऱ्या हिंद केसरी स्पर्धेसाठी चौधरी यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. निवड चाचणीदरम्यान चौधरी यांनी खेळलेल्या प्रेक्षणीय कुस्त्यांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत चौधरी यांनी चार सलग कुस्त्यांमध्ये विजय मिळवत आगेकूच केली.

 

पहिली कुस्ती: बाय, दुसरी कुस्ती: पै. अक्षय शेळके (लातूर) याला १२–० गुण फरकाने मात, तिसरी कुस्ती: पै. मोहम्मद पटेल (सातारा) यांनी पुढील खेळास नकार, चौथी कुस्ती: पै. सुनील लोटगोड (सांगली) याला कलात्मक कुस्तीने पराभूत करत एकंदर विजयी बाजी मारली. यानंतर विजय चौधरी यांची हिंद केसरी स्पर्धेत प्रतिनिधित्वासाठी निवड निश्चित करण्यात आली आहे.

 

याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना पै. विजय चौधरी म्हणाले, “महाराष्ट्र पोलिस दलाच्या पोलिसिंग कर्तव्या बरोबरच खेळात सुद्धा महाराष्ट्र पोलीसांचे देशभर नाव उज्ज्वल ठेवणे हा माझा ध्यास आहे. कुस्ती क्षेत्रातील मानाचा ‘हिंद केसरी’ किताब महाराष्ट्र पोलिस दलाच्या नावावर करण्यासाठी मी सर्वस्वाने प्रयत्न करणार आहे.”

 

चौधरी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र पोलिस दल तसेच नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे सर व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments