IRDAI च्या ‘इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047’ या दृष्टीकोनासाठी नवकल्पनांचा आराखडा सादर
• रिटेल, कमर्शियल आणि डिजिटल वितरण क्षेत्रातील बदलत्या संरक्षण गरजांसाठी नव्या कल्पनांची चर्चा
पुणे, 18 नोव्हेंबर 2025: नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी (NIA), पुणे यांनी ‘21वे इन्शुरन्स समिट 2025’ यशस्वीरित्या आयोजित केले. या समिटमध्ये वरिष्ठ उद्योग नेते, नियामक संस्था, रीइन्शुरर्स, अॅक्चुअरीज आणि इन्शुरटेक तज्ज्ञ यांनी भारताच्या विमा उद्योगातील प्रॉडक्ट इनोव्हेशनच्या भविष्यावर सखोल चर्चा केली. “प्रॉडक्ट इनोव्हेशन : रिइमॅजिनिंग & रिअलाईनिंग” या थीमवर आधारित हा कार्यक्रम विकसित भारत 2047 चे स्वप्न आणि IRDAI चे ‘Insurance for All by 2047’ हे ध्येय अधिक गतीने साध्य करण्यावर केंद्रित होता.
कार्यक्रमाची सुरुवात NIA चे संचालक श्री. बी.सी. पटनाईक यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर श्री. रत्नाकर पटनाईक, व्यवस्थापकीय संचालक, LIC ऑफ इंडिया यांनी उद्घाटनपर भाषण केले. श्री. संजय केडिया, CEO, Marsh McLennan India आणि अध्यक्ष व CEO, Marsh India Insurance Brokers Pvt. Ltd., यांनी विशेष संबोधन केले तसेच सुश्री. गिरीजा सुब्रमण्यन, CMD, द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड यांनी कीनोट भाषण दिले. मुख्य अतिथी श्री. सत्यजित त्रिपाठी (मेंबर – वितरण, IRDAI) यांनी भविष्यासाठी आवश्यक विमा उपाययोजनांवर व नियामक संस्थांच्या प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकला.
दिवसभर झालेल्या चर्चेतून स्पष्ट झाले की पुढील दहा वर्षे भारताच्या विमा उद्योगासाठी खूप महत्त्वाची असतील. साधी आणि समजण्यास सोपी उत्पादने, पारदर्शक प्रक्रिया, नवीन तंत्रज्ञान आणि सर्वांसाठी संरक्षण हीच दीर्घकालीन वाढीची मुख्य आधारस्तंभ ठरतील. तज्ज्ञांनी सांगितले की विमा उत्पादने आधुनिक करणे आणि वितरण व्यवस्था मजबूत करणे ही फक्त कामाची गरज नसून भविष्यासाठी महत्त्वाची रणनीती आहे, ज्यामुळे देशात मजबूत विमा व्यवस्था तयार होऊ शकेल.
समिटमध्ये बोलताना श्री. बी.सी. पटनाईक, संचालक, NIA, म्हणाले “या समिटमुळे उद्योग, धोरणकर्ते आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र येऊन विमा क्षेत्रातील बदल आणि नवकल्पनांवर चर्चा करण्याची उत्तम संधी मिळाली. आज मांडलेल्या विचारांनी सोपी, सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह विमा व्यवस्था तयार करण्याच्या उद्दिष्टाला आणखी मजबूत आधार मिळाला आहे.”
श्री. रत्नाकर पटनाईक, MD, LIC ऑफ इंडिया, म्हणाले: “सर्वांसाठी विमा हा उद्देश पूर्ण करण्यासाठी डिजिटल व सर्वसमावेशक वितरण, सोपी व कार्यक्षम प्रक्रिया आणि स्पष्ट उत्पादने खूप महत्त्वाची आहेत. LIC विमा क्षेत्रात नवकल्पना वाढवण्यासाठी पुढाकार घेऊन सकारात्मक बदल करण्यास कटिबद्ध आहे.”
श्री. संजय केडिया, CEO, Marsh McLennan India, म्हणाले: “येणाऱ्या काळात भारतातील जोखीम (Risk) परिस्थिती एकमेकांशी अधिक जोडली जाणार आहे. नवीन विमा उत्पादने, तज्ञांची योग्य मार्गदर्शन सेवा आणि डेटा वापरून केलेले वितरण हे उद्योग आणि समाजाला अधिक सुरक्षित व सक्षम बनवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.”
सुश्री. गिरीजा सुब्रमण्यन, CMD, द न्यू इंडिया अश्युरन्स, म्हणाल्या: “नवकल्पना फक्त जागरूकता वाढवण्यासाठी नसावी; ती बदल आणि सुधारणा घडवणारी असावी. यात सर्वांना योग्य संरक्षण, परवडणारी किंमत आणि लवचिक सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे. नवे आणि वंचित ग्राहकांपर्यंत खरोखर उपयोगी विमा पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे.”
मुख्य अतिथी श्री. सत्यजित त्रिपाठी (मेंबर – वितरण, IRDAI) म्हणाले “आमचे उद्दिष्ट सर्वांसाठी सोपे, समावेशक आणि विश्वासार्ह विमा वातावरण तयार करणे आहे. प्रत्येक नागरिकाला विम्याबद्दल योग्य माहिती, सहज प्रवेश आणि मिळणाऱ्या संरक्षणावर पूर्ण विश्वास मिळावा, हे आमचे ध्येय आहे. अधिक जागरूकता, विश्वास आणि सोपी उत्पादने-सेवा यामुळे विमा सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकतो.”
समिटचा समारोप सतत नवकल्पना, अधिक तंत्रज्ञान वापर आणि उद्योग व नियामक संस्थांमध्ये मजबूत सहकार्य वाढवण्याच्या आवाहनासह झाला. भारतीय विमा क्षेत्रात होणाऱ्या पुढील बदलांचे नेतृत्व करण्यासाठी NIA चे हे समिट पुढेही एक महत्त्वाचे
मंच ठरेल.


