पुणे
(प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्वेनगर मधील सह्याद्री प्रभात शाखेच्या वतीने नव सह्याद्री स्वच्छता कोठी येथे सामाजिक समरसतेचा संदेश देत”सामाजिक रक्षाबंधन-अनोखा रक्षाबंधन” उत्सव साजरा करण्यात आला.या उपक्रमांतर्गत संघ स्वयंसेवकांनी कर्वेनगर परिसरातील सर्व सफाई कामगारांना राख्या बांधल्या.परिसरातील स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या सेवकांचा सन्मान करणे हा या मागचा हेतू होता.यावेळी त्यांना मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.आम्ही स्वच्छतादूतांचे ऋणी आहोत आणि समाजातील सर्व घटक एकाच कुटुंबाचा भाग आहोत हा समरसता संदेश या निमित्ताने देण्यात आला.
सामाजिक बंधुभाव,आपुलकी व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश याद्वारे दिला गेला.
विंग कमांडर अविनाश मुठाळ (निवृत्त) यांनी “कचरावेचकांच्या स्वच्छतेविषयीच्या ते करत असलेल्या कामाबद्दल कौतुक करत त्यांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याविषयी काळजी घेण्याचे आवाहन केले.नागरिकांच्या उत्तम आरोग्याचे गमक तुमच्या कष्टांमुळे व नियमित कचरा उचलण्यातआहे.रक्षाबंधन हा केवळ सण नाही,तर सामाजिक बांधिलकी आहे.जे हात परिसर स्वच्छ ठेवतात त्या हातांना राखी बांधणे हे आमचे कर्तव्य आहे” असे प्रतिपादन यावेळी केले.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्वेनगर चे संघचालक उदयन पाठक,जेष्ठ स्वयंसेवक उल्हास सावळेकर,प्रा विवेक मांडके,अरविंदकरंबेळकर,महापालिकेचे मनोज साकळे,कृष्णा धनगर,मनोज मोहिते,अमर कांबळे,दत्ता दोडके,ओंकार बेनकर,दीपक भोंडे,दत्तात्रय जगताप,निखिलभिसे,गौरव अडगळे,नगरसेविका ॲड मिताली सावळेकर,वेदांत गवळेकर,सह्याद्री प्रभात शाखेचे सह शिक्षक प्रकाशदेशपांडे ह्यांची मुख्य उपस्थिती होती.ह्यावेळी उदयन पाठक म्हणाले,”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त “पंच परिवर्तन”दारे विविध सामाजिक सेवा प्रकल्प संपूर्ण देशभर संघ राबवित असल्याचे सांगितले. “सामाजिक रक्षाबंधन”द्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील सर्व घटकांना जोडण्याचे कार्य देशभर करीत आहे.”
यावेळी महिला व पुरुष मिळून एकूण साठ कचरावेचक,कर्वेनगर,शैलेश मधील व्यावसायिक,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या “सामाजिक रक्षाबंधन” च्या निमित्ताने राख्यांमधून कृतज्ञतेची भावना दिसल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.
——
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कर्वेनगर येथे “सामाजिक रक्षाबंधन”. —— स्वयंसेवकांनी नवसह्याद्री स्वच्छता कोठी येथे साजरे केले
RELATED ARTICLES


