Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाइलस्टोन गिअर्स’ने ११०० कोटींच्या आयपीओसाठी सेबीकडे दाखल केला डीआरएचपी

माइलस्टोन गिअर्स’ने ११०० कोटींच्या आयपीओसाठी सेबीकडे दाखल केला डीआरएचपी

माइलस्टोन गिअर्स लिमिटेड ही ट्रान्समिशन यंत्रणेतील अत्यंत अचूक व गुंतागुंतीच्या अभियांत्रिकीद्वारे तयार होणाऱ्या कॉम्पोनंट्सचे उत्पादन करणारी कंपनी आहे. ट्रॅक्टर, बांधकाम उपकरणे, विद्युत वाहने (ईव्ही), लोकोमोटिव्ह, पवनचक्क्या आणि इतर जड उद्योग अशा विविध क्षेत्रांत या कंपनीची उत्पादने वापरली जातात. कंपनीने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीएचआरपी) सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या संस्थेकडे दाखल केला आहे.

 

 

 

प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या इक्विटी समभागांच्या प्राथमिक विक्रीतून एकूण ११०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा कंपनीचा हेतू आहे. ८०० कोटी रुपयांपर्यंतच्या नवीन इक्विटी समभागांची विक्री (फ्रेश इश्शू) आणि विक्रीस इच्छुक भागधारकांकडील ३०० कोटी रुपयांपर्यंतच्या समभागांची विक्री (ऑफर फॉर सेल) यांचा समावेश या प्रस्तावात आहे.

 

 

 

या आयपीओतून मिळणारा निव्वळ निधी (अ) कंपनीने घेतलेल्या काही थकित कर्जरकमेची व त्यावरील व्याजाची संपूर्ण किंवा अंशतः परतफेड / पूर्वपरतफेड; (ब) हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात बद्दी तालुक्यामध्ये मोहाल बटेड येथील नवीन कारखान्याच्या (नियोजित ग्रीनफिल्ड प्रकल्पाच्या) उभारणीसाठी आवश्यक भांडवली खर्चाची तरतूद; आणि (क) इतर सामान्य कॉर्पोरेट गरजा यांकरीता वापरण्याचा कंपनीचा मानस आहे.

 

 

 

माइलस्टोन गिअर्स लिमिटेड ही ट्रान्समिशन यंत्रणेतील अत्यंत अचूक व गुंतागुंतीच्या अभियांत्रिकीद्वारे तयार होणाऱ्या कॉम्पोनंट्सचे उत्पादन करणारी कंपनी आहे. ट्रॅक्टर, बांधकाम उपकरणे, विद्युत वाहने (ईव्ही), लोकोमोटिव्ह, पवनचक्क्या आणि इतर जड उद्योग अशा विविध क्षेत्रांत या कंपनीची उत्पादने वापरली जातात. भारतातील आणि इतर देशांतील मूळ उपकरण निर्मात्या (ओईएम) ग्राहकांना, तसेच त्यांच्या संलग्न संस्थांना कंपनी आपली उत्पादने पुरवते. १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२५ या कालावधीत कंपनीने ५० पेक्षा अधिक ग्राहकांना पुरवठा केला असून भारतातील ट्रॅक्टर क्षेत्रातील सर्व नऊ अग्रणी ओईएम कंपन्या (स्त्रोत: १लॅटिस अहवाल) यांचाही त्यांत समावेश आहे. यांपैकी बहुसंख्य ग्राहकांशी कंपनीने दीर्घकालीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले आहेत.

 

 

 

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस अंतर्गत ऑफर होणारे इक्विटी समभाग हे बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) येथे सूचीबद्ध करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.

 

 

 

या आयपीओ जेएम फायनान्शियल लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड यांना बुक-रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून नेमण्यात आले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments