Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedद वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडला स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF) सुरू करण्यासाठी सेबीची...

द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडला स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF) सुरू करण्यासाठी सेबीची मंजुरी मिळाली

स्पष्टतेवर आधारित आणि ठाम विश्वासाने चालणारा हा SIF बाजारातील विविध चक्रांमध्ये परतावा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवेल, तसेच पारदर्शक आणि नियमनबद्ध ढाच्याचे फायदेही देईल.

 

मुंबई, 25 नोव्हेंबर 2025 : पँटोमाथ समूहाचा भाग असलेल्या द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडने आज जाहीर केले की त्यांना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून त्यांच्या स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF) लाँच करण्यास मंजुरी मिळाली आहे. हे उत्पादन भारतातील पहिल्यांदाच सादर होणारे, रणनीती-आधारित असे मॉडेल असून, पारदर्शक आणि सक्षम नियमन असलेल्या वातावरणात हेज फंडसारखी गतिशीलता देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. या मंजुरीनंतर, द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड हे भारतातील निवडक एएमसींपैकी एक झाले आहे, ज्यांना SIF धोरणे ऑफर करण्याची परवानगी मिळाली आहे. हा SIF ‘WSIF’ या ब्रँड नावाखाली चालवला जाईल.

 

द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडने श्री. चिन्मय साठे यांची चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर आणि हेड – स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड म्हणून नियुक्ती केली आहे.

 

WSIF ही स्पष्टता आणि ठाम विश्वास यांचा संतुलित मिलाफ असलेल्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड इंटेलिजेंट अ‍ॅग्रेस्शन या दृष्टिकोनाने कार्य करतो, ज्यामागे काटेकोर संशोधन आणि खोल बाजारअनुभवाची भक्कम पायाभरणी आहे. कंपनीचा विश्वास आहे की पोर्टफोलिओतील प्रत्येक पोझिशन ही शिस्तबद्ध प्रक्रियेवर, सतत संशोधनावर आणि दीर्घकालीन कामगिरीसाठी असलेल्या अविरत बांधिलकीवर आधारित असली पाहिजे. थोडक्यात, WSIF म्हणजे — विचारातील स्पष्टता, अंमलबजावणीतील नेमकेपणा आणि दीर्घकाळ टिकणारे, वेगळेपणा निर्माण करणारे परतावे देण्यासाठी अर्थपूर्ण रिस्क-टेकिंगला प्राधान्य देणारे तत्त्वज्ञान.

 

SIF मंजुरीबाबत बोलताना द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडच्या संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मधु लुनावत म्हणाल्या : “स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड हे भारतातील म्युच्युअल फंड उद्योगातील नाविन्याच्या पुढच्या टप्प्याचे प्रतीक आहे. WSIF मध्ये आम्ही उच्च-विश्वास, संशोधन-आधारित SIF देण्याचा हेतू ठेवतो, जे ‘इंटेलिजेंट अ‍ॅग्रेस्शन’, अचूक जोखीम-वाटप आणि हेजिंग तसेच डायरेक्शनल टूल्सच्या रणनीतिक वापराद्वारे मार्केट सायकल्समध्ये प्रभावीपणे मार्गक्रमण करू शकेल — आणि हे सर्व पूर्ण शिस्त, स्पष्टता आणि दीर्घकालीन उत्कृष्ट परिणामांच्या दृढ बांधिलकीसह अंमलात आणले जाईल. ग्राहकांच्या वेगवेगळ्या जोखीम प्रोफाइल आणि ॲसेट अलोकेशन पसंतीनुसार SIF अंतर्गत अनेक उत्पादने आम्ही सादर करण्याची योजना आखली आहे.”

 

यावर पुढे बोलताना द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर व हेड – SIF श्री. चिन्मय साठे म्हणाले : “WSIF मध्ये आमचे ध्येय असे वेगळेपण असलेले इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्स विकसित करणे आहे, जे ग्राहकांच्या विशिष्ट जोखीम प्रोफाइल व स्ट्रॅटेजिक ॲसेट अलोकेशनच्या गरजांशी जुळतील. आमची उत्पादने ‘कन्विक्शन आणि क्लॅरिटी’ या तत्त्वज्ञानावर आधारित असतील, ज्यामागे काटेकोर संशोधन आणि खोल बाजारानुभव असेल. आम्ही ‘इंटेलिजेंट अ‍ॅग्रेस्शन’ या दृष्टिकोनाने प्रेरित आहोत आणि आकर्षक ‘रिवॉर्ड अ‍ॅसिमेट्री’ असलेल्या संधींवर लक्ष केंद्रीत करतो.”

 

SEBI-नियमन असलेल्या म्युच्युअल फंड स्ट्रक्चरमध्ये हेज फंडसारखी लवचिकता आणून SIF कॅटेगरीने भारताच्या गुंतवणूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल घडवला आहे. द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडचा SIF (WSIF) अशा गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वपूर्ण अलोकेशन पर्याय ठरणार आहे, जे जास्तीत जास्त अपसाइड भागीदारी तर शोधत आहेतच, पण त्याचवेळी अर्थपूर्ण डाउनसाइड संरक्षण देखील अपेक्षित ठेवतात. इन्स्टिट्यूशनल-ग्रेड संशोधन आणि जोखीम व्यवस्थापन ढाच्यावर आधारित हा फंड HNI ग्राहक, फॅमिली ऑफिसेस आणि प्रगत वेल्थ प्लॅटफॉर्म्ससाठी शिस्तबद्ध, सर्वहंगामी (all-weather) समाधान देण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments