गुरूग्राम, भारत – नोव्हेंबर २४, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज जनरल इमेजिंगसाठी त्यांच्या सुपर-प्रीमियम, नेक्स्ट-जनरेशन आर२० अल्ट्रासाऊंड सिस्टमच्या लाँचची घोषणा केली. आर२० जनरल इमेजिंगमधील अग्रणी झेप आहे, ज्यामध्ये प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स, उच्च दर्जाची इमेज क्लेरिटी आणि क्लिनिशियनचा कम्फर्ट व कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित केलेली एर्गोनॉमिक डिझाइन आहे.
सॅमसंगचे अत्याधुनिक किस्टल आर्किटेक्चर™वर आधारित आर२० विविध जनरल इमेजिंग उपयोजनांमध्ये अपवादात्मक इमेज समानता, रिझॉल्यूशन व प्रवेश दर्शवते. यामधील नेक्स्ट-जनरेशन इमेजिंग इंजिन, शक्तिशाली जीपीयू आणि अल्ट्रा-हाय-डेफिनिशन ओएलईडी मॉनिटर क्लिनिशियन्सना प्रत्येक स्कॅनमध्ये उल्लेखनीय सुस्पष्टता देते, ज्यासह त्यांना आत्मविश्वासाने निदान करता येते.
आर२० मध्ये एआय-समर्थित क्लिनिकल व कार्यप्रवाह वाढवणाऱ्या टूल्सची सर्वसमावेशक श्रेणी आहे, जे गुंतागूंतीच्या प्रक्रिया सुव्यवस्थित करतात आणि वारंवार केल्या जाणाऱ्या टास्क्सना स्वयंचलित करतात. प्रमुख तंत्रज्ञान पुढीलप्रमाणे:
· लाइव्ह लिव्हरअसिस्ट – प्रत्यक्ष अल्ट्रासाऊंड स्कॅनदरम्यान संशयास्पद फोकल जखम ओळखते.
· लाइव्ह ब्रेस्टअसिस्ट – BIRADS क्लासिफिकेशन व रिपोर्टिंगसह स्तनावरील जखमांचे रिअल-टाइम निदान करते.
· ऑटो मेजरमेंट टूल्स – एआय-आधारित स्वयंचलित निदान, अंतर्गत संरचनांच्या मापनासह उच्च सातत्यता व अधिक प्रवाह क्षमतेसाठी मार्गदर्शित रिपोर्टिंग.
· डीप यूएसएफएफ – एआय आधारित डीप अल्ट्रासाऊंड फॅट फ्रॅक्शन क्वॉन्टिफिकेशन, जे सुवर्ण मानक म्हणजे एमआरआय पीडीएफएफशी उच्च संबंधित आहे.
उच्च दर्जाच्या इमेजिंग आर्किटेक्चरसह आर२० अॅब्डोमेन, थायरॉईड, मस्क्यूकोस्केलेटल, रक्तवहिन्या, स्तन, ऑब्स्टेट्रिक्स, ग्यानेकोलॉजी आणि यूरोलॉजी इमेजिंग अशा विविध क्लिनिकल उपयोजनांमध्ये उल्लेखनीय कार्यक्षमता देते. सुधारित डॉपलर संवेदनशीलता आणि कलर फ्लो व्हिज्युअलायझेशन क्लिनिशियन्सना अधिक अचूकता व आत्मविश्वासासह रक्तवाहिन्या रचना व पॅथालॉजींचा शोध घेण्यास मदत करतात. या वैविध्यतेमधून खात्री मिळते की, आरोग्यसेवा व्यावसायिक विविध रूग्णांच्या बाबतीत सातत्यपूर्ण, उच्च दर्जाचे निदान प्राप्त करू शकतात.
”आर२० मधून सर्वोत्तम नाविन्यतेच्या माध्यमातून आरोग्यसेवा प्रगत करण्याप्रती सॅमसंगची कटिबद्धता दिसून येते. मुलभूत बाब म्हणून एआयला प्राधान्य देत आणि इमेज उत्कृष्टता व क्लिनिशियन कम्फर्टवर लक्ष केंद्रित करत आर२० अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानामधील आमूलाग्र परिवर्तन आहे, जे डॉक्टरांना प्रत्यक्ष स्कॅनिंग करताना जखमा ओळखण्यास मदत करते,” असे सॅमसंग इंडियाच्या एचएमई व्यवसायाचे प्रमुख अतंत्र दास गुप्ता म्हणाले.
इमेजिंग क्षमतांव्यतिरिक्त आर२० वापरकर्त्यांना आरामदायीपणा व ऑपरेशल उत्कृष्टता देते. एर्गोनॉमिक्स लक्षात घेत डिझाइन करण्यात आलेल्या या सिस्टममध्ये वजनाने हलके ट्रान्सड्यूसर केबल्स, सर्वोत्तम टच इंटरफेस आणि सानुकूल सिस्टम कन्फिग्युरेशन्स आहेत, जे विविध क्लिनिकल गरजांची पूर्तता करतात. सिस्टमची सुधारित डिझाइन तणाव व थकवा कमी करते, ज्यामुळे क्लिनिशियन्स सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या रूग्णांवर लक्ष केंद्रित करू शकतात.
आर२० च्या लाँचसह सॅमसंग आरोग्यसेवा तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्याप्रती आपली कटिबद्धता दृढ करत आहे. एआय-संचालित उत्कृष्टता व उच्च दर्जाच्या इमेजिंग कार्यक्षमतेला एकत्र करत आर२० जनरल इमेजिंग क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज आहे. या सिस्टमची डिझाइन क्लिनिशियन्स व रूग्णांना अधिक केअर देते.
सॅमसंग आर२० बाबत अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: https://samsunghealthcare.com/en.
सॅमसंग न्यूजरूम इंडिया: Samsung Launches R20 Ultrasound System Redefining General Imaging with Next-Gen AI


