Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedझाकीर हुसेन यांना आदरांजली वाहण्यासाठी ५० हून अधिक कलाकार एनसीपीएमध्ये एकत्र येणार

झाकीर हुसेन यांना आदरांजली वाहण्यासाठी ५० हून अधिक कलाकार एनसीपीएमध्ये एकत्र येणार

पुणे, २४ नोव्हेंबर २०२५ : भारतीय आणि पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतापासून रॉक, पॉप, जॅझ, वर्ल्ड म्युझिक आणि इतर अनेक शैलींची अद्वितीय प्रतिभा असणाऱ्या दूरदर्शी संगीतकार आणि तबलावादक झाकीर हुसेन यांचे मागील वर्षी १५ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एनसीपीए राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५० हून अधिक कलाकार, विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांसह ‘माएस्ट्रो फॉरेव्हर’ या दोन दिवसीय जागतिक आदरांजली कार्यक्रमासाठी एकत्र येणार आहेत. या कलाकारांपैकी अनेकांनी झाकीर हुसेन यांच्यासोबत रंगमंचावर काम केले असून त्यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते. १४ आणि १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालणारा हा दोन दिवसांचा स्मरणोत्सव कार्यक्रम एनसीपीएच्या विविध ठिकाणी आयोजित केला जाईल.

 

या कार्यक्रमात जॉन मॅक्लॉफ्लिन , लुईस बँक्स, डेव्ह हॉलंड, गणेश राजगोपालन, रणजीत बारोट, व्ही. सेल्वा गणेश, शंकर महादेवन, क्रिस पॉटर, संजय दिवेचा, जीनो बँक्स, अजोय चक्रवर्ती, अमजद अली खान आणि राकेश चौरसिया यांसारखे दिग्गज सहभागी होणार आहेत.

 

या दोन दिवसीय कार्यक्रमात संगीत सादरीकरणे, व्याख्यान-प्रात्यक्षिके, संभाषणे, त्यांच्या प्रवासाचे दर्शन घडवणारी छायाचित्र प्रदर्शन आणि माहितीपटांचे प्रदर्शन यांचा समावेश असेल.

 

या आदरांजली सोहळ्यासाठी त्यांची पत्नी अँटोनीया, मुली अनीसा आणि इसाबेल्ला तसेच त्यांचे भाऊही सहभागी होणार आहेत.

 

१९६९ मध्ये एनसीपीएच्या स्थापना दिनी त्यांचे वडील व दिग्गज उस्ताद अल्लारखा यांच्यासोबत त्यांनी केलेल्या सादरीकरणासह एनसीपीएशी त्यांचा संबंध एका ऐतिहासिक टप्प्यावर सुरु झाला. त्यानंतर ५५ वर्षांच्या या संबंधामध्ये अनेक ऐतिहासिक मैफिली आणि सिम्फनी ऑर्केस्ट्रा ऑफ इंडिया (एसओआय) सोबत त्यांच्या सहकार्याचा समावेश होता. गेल्या दशकात त्यांनी एसओआय साठी दोन मूळ रचना लिहिल्या. एनसीपीए चे एक सन्माननीय सदस्य म्हणून त्यांनी काम केले.

 

एक दिग्गज कलावंत असण्यापलीकडे त्यांचा नम्र स्वभाव, उदारपणासाठी ते ओळखले जायचे.अशा गुणांमुळे ते प्रेक्षकांना आणि सह कलाकारांना प्रिय होते

.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments